शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे-ॲड.के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि. प. अध्यक्षा सीमा वळवी, आमदार जिल्हाधिकारी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि. प. अध्यक्षा सीमा वळवी, आमदार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अजय परदेशी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, लसीकरणासाठी गावात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. लसीकरणासह कोरोनाबाधिताच्या संस्थात्मक विलगीकरणावरही भर द्यावा. कोरोना संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करावे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विलगीकरण कक्ष तातडीने कार्यान्वित करावा. आवश्यक सुविधांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करावा. आरोग्य विभागाच्या जुन्या रुग्णवाहिकांचा उपयोग शववाहिनीसाठी करावा. ग्रामपंचायतींनी शववाहिनीसाठी वाहन भाड्याने घ्यावे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपल्या क्षेत्रात कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक नियोजन करावे व त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. भारुड म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक सीटी स्कॅन केंद्राजवळ रॅपिड ॲन्टिजेन चाचणीची सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विलगीकरण कक्षा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणासाठी वेळ लागू नये यासाठी ग्रामपंचायतींनी पात्र व्यक्तींच्या नोंदणीची कार्यवाही तातडीने करावी.

लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी आणि प्रत्येक नगर पालिका क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विद्युत दाहिनीची सुविधा करावी असे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनीदेखील ही सुविधा करण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.