शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सहायक शिक्षण प्रकल्प व विस्तार अधिकाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आदिवासी विकास विभागातील सहायक शिक्षण प्रकल्पाधिकारी या पदाची सेवा शर्ती नियमावली तयार करतांना माध्यमिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आदिवासी विकास विभागातील सहायक शिक्षण प्रकल्पाधिकारी या पदाची सेवा शर्ती नियमावली तयार करतांना माध्यमिक शिक्षक या संवर्गातून करावी व कार्यरत सहायक प्रकल्प अधिकारी यांना रुजू दिनांकापासून कायम करावे या मागणीसाठी सहा. प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ विस्तार अधिकारी  हे आदिवासी आयुक्तालयासमोर ११ जानेवारीपासून  उपोषण करणार आहेत. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाअंतर्गत शिक्षण कक्षाची स्थापना १९९९ पासून करण्यात आली आहे. त्यात विविध संवर्गातील शिक्षण विभागाची पदे मंजूर आहेत. त्यात शिक्षण सहायक प्रकल्प अधिकारी हे पद मंजूर असून त्या पदाची वेतनश्रेणी अन्यायकारक आहे.  या पदावर  २००५ पासून सतत १५ वर्षापासून माध्यमिक  शिक्षक हे कार्यरत असून बरेच माध्यमिक शिक्षक हे सहायक प्रकल्प अधिकारी या पदावर त्याच वेतनावर सेवानिवृत्त झालेले आहेत. नवीन सेवा शर्ती तयार करतांना कार्यरत असलेल्या सहायक प्रकल्प अधिकारी यांना डावलून माध्यमिक मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व गृहपाल या संवर्गातील कर्मचाऱ्यांची चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने सेवा शर्ती नियमावली तयार करण्याचे कामकाज सुरू आहे. शिक्षण सहायक प्रकल्प अधिकारी या पदासाठी सेवाशर्ती नियमावली तयार करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या सेवा शर्ती नियमावलीनुसार पदोन्नतीने फक्त माध्यमिक शिक्षक या संवर्गातून भरण्याची सेवाशर्ती नियमावली तयार करावी. सद्या कार्यरत  असलेल्या सहायक प्रकल्प अधिकारी यांची सेवा रुजू दिनांकापासून नियमित करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जानेवारीपासून नाशिक येथे आदिवास आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.