शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील अनेक भागात भुकंपाच्या धक्क्यांमुळे एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवार, २ जानेवारी दुपारी १.२४ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल व ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवार, २ जानेवारी दुपारी १.२४ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल व १:२६ वाजताच्या सुमारास २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शहरासह तालुक्यात कुठेही जीवित वा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.शनिवारी दुपारच्या सुमारास शहरातील सोनार गल्ली भागात अचानक मोठा आवाज झाल्याने व्यावसायिकांसह परिसरातील नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील गोगापूर जयनगर वडाळी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तालुक्यातील सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे ३.२ व २.६ रिश्टर स्केलचा धक्का असल्याची नोंद झाली आहे आहे शहरापासून सुमारे २४ किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील पानसेमल तालुका हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापन केंद्राने दिली आहे. या धक्क्यामुळे कुठे नुकसान झाले नसले तरी दिवसभर प्रशासनाला  ग्रामीण भागातील नागरिकांचे फोन येत होते.भूकंपाचे धक्के जाणवताच शहरात व ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिक आपले घर परिसर सोडून मोकळ्या जागेत आले होते. दिवसभर सोशल मीडियावरही भूकंपाबाबत माहिती दिली जात होती व विचारणा केली जात होती.भूकंपाचे धक्के जाणवले याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले होते. प्रशासनाने सर्व मंडळ  अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपापल्या परिसरातील परिस्थितीची माहिती जाणून घेतल्यानंतर तालुक्यात कुठलीही मोठी वित्त व जीवित हानी झालेले नाही. मात्र काही ठिकाणे रस्त्यांना तडे पडल्याची माहिती मिळत आहे.वर्षभरापूर्वी... n गेल्यावर्षीही जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळेस ४.२ रिश्टर स्केलचा हा धक्का असल्याची नोंद सावळदा येथील भूकंप मापन केंद्रावर झाली होती. आता पुन्हा या वर्षी नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने हा योगायोग की भविष्यातील दुर्घटनेबाबत पूर्वसूचना यावरही जाणकारांमध्ये चर्चा सुरू होती.

परिसरात पाहणी करून आलो. स्थानिक यंत्रणेला सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये. अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे काही जाणवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा.