शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

साडेनऊ लाखाच्या गुटख्यासह डंपर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारात येणारा नऊ लाख 67 हजारांच्या  गुटख्यासह 25 लाखांचा डंपर एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारात येणारा नऊ लाख 67 हजारांच्या  गुटख्यासह 25 लाखांचा डंपर एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री नंदुरबारात जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकेश काशिनाथ नाईक, मनिष गणेश ठाकरे, नरेश विनोद पाडवी व राहुल भिका पाडवी सर्व रा.नळवा, ता.नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. डंपर मालक नरेंद्रसिंग राजपूत यांचा तपास सुरू आहे.गुजरातमधून नंदुरबारात गुटख्याचा साठा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. पथकाने 15 रोजी रात्री 11 वाजेपासून निझर रस्त्यावर सापळा लावला होता. 16 रोजी उत्तररात्री दीड वाजता निझरहून भरधाव वेगात एक डंपर येतांना दिसला. पथकाने   डंपरला थांबविण्याचा इशारा केला, परंतु भरधाव डंपर पुढे गेला.    पाठलाग करून डंपरला थांबविले. डंपरमधील चालकासह तिघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पथकाने डंपरमधील सामानाची तपासणी केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला. सात लाख 53 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पानमसालाचे 30 पोते, एक लाख 88 हजार 400 रुपये किंमतीच तंबाखूचे सहा पोते, 25 हजार रुपयांच्या इतर वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी मुद्देमालासह 25 लाखांचा डंपरही जप्त केला.ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची चौकशी केली असता त्यांनी डंपर नरेंद्रसिंह राजपूत यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. निझर येथून होलाराम सिंधी यांच्या गोडावूनमधून गुटखा भरून नंदुरबारात आणण्यास सांगण्यात आले होते. कुठे उतरावयाचा याबाबत नंदुरबारात पोहचल्यावर सांगण्यात येणार होते. शिवाय स्वत: राजपूत हा डंपरच्या    पुढे कारने चालत असल्याचे  सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांसह नरेंद्रसिंह राजपूत, होलाराम सिंधी यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात विविध   कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार प्रदिपसिंह राजपूत, दिपक मोरे, युवराज चव्हाण, अविनाश चव्हाण, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांनी केली.