शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात 94 लाख खड्डे खोदून तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत 90 लाखांपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत 90 लाखांपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आह़े यासाठी 94 लाख खड्डे खोदून तयार झाले असून 1 जुलैपासून जिल्ह्यात होणा:या वनमहोत्सव व वृक्षारोपणासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरु आह़े   राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े परंतू प्रशासनाने वाढीव उद्दीष्टय़ स्विकारत 94 लाख 58 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आह़े जिल्ह्यात एकूण 6 हजार 600 ठिकाणी वृक्ष लागवड होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 1 जुलैपासून सुरु होणा:या वृक्षारोपण मोहिमेसाठी आतार्पयत 94 लाख 14 हजार खड्डे खोदून तयार ठेवण्यात आल्याने यंदा वृक्षारोपणाचे उद्दीष्टय़ पूर्ण होणार आह़े वृक्षलागवड मोहिमेसाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे तयारीला वेग देण्यात येत असून विविध विभागांना रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वन विभाग 47 लाख तर सामाजिक वनीकरण विभाग सुमारे 23 लाख रोपांची लागवड करणार आहे. कृषी विभाग 2 लाख 92 हजार तर ग्रामपंचायतस्तरावर 18  लाख 50 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यंदाही प्रशासनाने फळझाडांसह इतर देशी वृक्ष प्रजातींची नियोजित जागांवर लागवड करण्याचे आदेश काढले आहेत़  वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम तब्बल तीन महिने सुरू राहणार असून नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरावर समन्वयक अधिका:यांची नियुक्ती केली गेली आह़े 

नंदुरबार  दरम्यान वृक्ष लागवडीच्या कामांची पडताळणी करण्यासाठी वृक्ष लागवडीच्या प्रत्येक स्थळाचे जीओटॅगींग करण्यात येत आह़े ही माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आह़े यामुळे वृक्षारोपणाची स्थिती समजून येऊन पारदर्शक कामकाज होणार आह़े यंदा झाडांच्या संगोपनाला अधिक बळकटी देण्यासाठी वनविभागाच्या प्रयत्नातून  जिल्ह्यातील मुख्य नद्या व उपनद्यांच्या किना:यावर 137 क्षेत्रात वृक्षारोपण केले जाणार आह़े यामुळे या झाडांची स्थिती मजबूत राहून त्यांची वाढ लवकर होणार असल्याचे गृहित धरण्यात येत आह़े  वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या एकूण 159 रोपवाटिकांद्वारे आवश्यक ती रोपे तयार करण्यात येत असल्याचे चित्र आह़े