शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी फ्यूजपेटय़ांमध्ये शिरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वीज वितरण कंपनीने तळोदा शहराला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूजपेटय़ा जमिनीपासून काही अंतरावरच असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वीज वितरण कंपनीने तळोदा शहराला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूजपेटय़ा जमिनीपासून काही अंतरावरच असल्याने पावसाचे पाणी त्यात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फ्यूजपेटय़ा धोकेदायक बनल्या असून संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिका:यांनी दखल घेऊन ह्या पेटय़ा उंचावर बसवाव्यात, अशी शहरवासीयांची मागणी आहे.तळोदा शहराला सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून गेल्यावर्षी साधारण 17 वाढीव नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. तथापि, काही ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर बसविताना संबंधित ठेकेदाराने जमिनीपासून तीन ते चार फुटावरच फ्यूजपेटय़ा बसविल्या आहेत. विशेषत: नवीन वसाहती, कॉलेज रस्ता, हातोडा रस्त्यावरील ट्रॉन्सफॉर्मरच्या फ्यूजपेटय़ांची अशी अवस्था आहे. सध्या तळोदा शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सखल भागात हे पाणी मोठय़ा प्रमाणात साचत आहे. शेतशिवारातील पाणी कॉलेज रस्त्यावर प्रचंड प्रमाणात साचते. याठिकाणी तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याचठिकाणी चौफुलीपासून नजीक नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसवला आहे. त्याची फ्यूजपेटी जमिनीपासून अडीच--तीन फुटावरच असल्यामुळे फ्यूजपेटीत केव्हाही पाणी शिरण्याची  शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय ती फ्यूजपेटीदेखील उघडी आहे. त्यामुळे अप्रिय घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हा रस्ता महाविद्यालयाकडे जातो. साहजिकच महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय येथे ग्रामीण भागातून येणा:या नागरिकांचीही मोठी वर्दळ असते.  त्यामुळे सध्या धोकेदायक ठरलेल्या या फ्यूजपेटय़ा उंचावर बसविण्याबाबत वीज कंपनीच्या अधिका:यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.