शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

डिझेलअभावी गाळ काढणी रखडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:28 IST

गाळमुक्त धरण उपक्रम : कामाला गती देण्याची ग्रामस्थांची मागणी

शनिमांडळ : गाळमुक्त धरण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध धरणांतील गाळ काढणीची कामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ शासनाच्या खर्चातून हे काम करण्यात येणार असल्याने पोकलॅण्ड, डिझेल आदींची जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती़ परंतु आता डिझेल उपलब्ध होत नसल्याने गाळ काढण्याच्या कामाची गती मंदावली असल्याची माहिती आहे़गाळमुक्त धरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील साधारणत: २५ ते ३० तलावांमधून गाळ काढणीच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती़ त्यानुसार कामेही सुरु झालेली आहेत़ परंतु आता डिझेलअभावी कामे संथ गतीने होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत कामाची गती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ट्रॉलीमागे शंभर रुपयेदरम्यान, पोकलॅण्डतर्फे गाळ काढण्यात येत असल्याने यासाठी डिझेलची आवश्यकता भासत असते़ परंतु जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकींच्या धामधुमीमध्ये याकडे लक्ष दिले जात नसल्याने साहजिकच बऱ्याच वेळा गाळ काढणीची कामे मंदावत असतात़ दरम्यान, तलावातील गाळ शेतीसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात गाळ टाकण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे गाळाच्या एका ट्रॉलीमागे शंभर रुपये शेतकरी मोजत असून यातूनच डिझेलचा खर्च भागवण्यात येत असल्याची माहिती आहे़ गाळ काढण्याचा उपक्रम शासनाच्या खर्चातून हाती घेण्यात आला असला तरी आता शेतकऱ्यांच्या पैशातूनच डिझेलचा खर्च काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़उर्वरीत ठिकाणीही गाळ काढावाजिल्ह्यातील उर्वरीत गाव तलावांचाही लवकरात लवकर गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ६८ पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे़ अक्कलकुवा तालुक्यात ५, धडगाव ३, नंदुरबार २५, नवापूर १२, शहादा १८ तर तळोद तालुक्यातील ५ पाझर तलावातून गाळ काढणीची कामे पूर्ण करण्यात आली आहे़ या ६८ तलावांमधून साधारणत: १ लाख ८९ हजार ९ घमी इतका गाळ काढण्यात आलेला आहे़ यासाठी २० लाख ७९ हजार रुपयांचा खर्च लागला असल्याची माहिती सांगण्यात आली़दरम्यान, खोक्राळे, निंभेलख वडबारे, वावद, श्रीरामपूर, लोणखेडा, जुनमोहिदे, कंढरे, उमर्दे बु, भालेर, तिसी, शिंदगव्हाण, वडवद, अक्राळे, आसाणे, नांदखर्डे, चाकळे, घोटाणे, भिलाईपाडा, वाघाळे, बलवंड, रजाळे, खर्दे तलवाडे आदी पाझर तलावांमधून गाळ काढण्याची कामे करण्यात येत असून त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे़ गाळ काढणीच्या कामांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून देण्यात येणार आहे़१५ ते २० फुटांपर्यंत गाळअनेक ठिकाणच्या ब्रिटीश कालीन गाव तलावांमध्ये सुमारे १५ ते २० फूट जाडी असलेला गाळाचे संचयन झाले आहे़ त्यामुळे पावसाळ्यात गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरत नसून पावसाचे पाणी वाहून जात आहे़ पहिल्यापासून नंदुरबार तालुक्यातील पुर्वेकडील भागात पाण्याची वानवा आहे़ भौगोलिक कारणांमुळे या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत निम्यापेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पाण्याचे नेहमीच दुर्भिष्य जाणवत असते़ त्यामुळे ब्रिटीश सरकारणे विविध ठिकाणी तलाव बांधून त्यावेळी पाण्याचे नियोजन केले होते़ परंतु बरीच वर्षे होऊनदेखील अद्यापर्यंत या तलावातून गाळ काढण्यात आलेला नव्हता़ दरम्यान, शनिमांडळ येथील तलाव तसेच आंबेबारा येथील तलावाच्या माध्यमातून शनिमांडळसह, तिलाली, तलवाडे, रजाळे, बलवंड या गावांची तहान भागवली जात असते़ आता सध्या हा गावतलाव पूर्णपणे कोरडा झाला असून या तलावाचा गाळ काढणेही प्रशासनाला सोयीस्कर ठरत आहे़ यंदा जिल्ह्यात केवळ ६७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असल्याने साहजिकच तलावदेखील कोरडा पडलेला आहे़ त्यामुळे तलावाचा गाळ काढण्यात यावा यासाठी गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता़ दरम्यान, उपक्रमाबाबत रोजगार हमी योजनेच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ़ अर्चना पठारे यांनी पाठपुरावा करुन सुरुवात केली होती़ त्यानंतर नवीन अधिकारी बदलून आल्याने उपक्रमाची कामेदेखील रखडली आहेत़