शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपान करुन वाहन चालवणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करुन वाहन चालवणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे़ वाहतूक शाखेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करुन वाहन चालवणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे़ वाहतूक शाखेने ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे चाचणी केल्यानंतर चौघांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ विशेष म्हणजे चौघांची नववर्षाची सुरुवात न्यायालयात झाली होती़नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर भरधाव वेगात वाहने चालवून गंभीर व प्राणघातक अपघातांना सामोरे जाण्याच्या घटना जिल्ह्यात यापूर्वीही घडल्या आहेत़ या घटनांना आळा घालण्यासाठी यंदा वाहतूक शाखेने कंबर कसली होती़ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांच्या मार्गदर्शनात ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील पाच ठिकाणी पॉर्इंट उभारुन वाहन तपासणी सुरु होती़ यात शहरातील जगतापवाडी चौक, बसस्थानक परिसर, धुळे चौफुली आणि रेल्वेस्टेशन रोड परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांची ब्रेथ अ‍ॅनलायझिंग टेस्ट करण्यात आल्यानंतर चौघे मद्यपान करुन ुदुचाकी व चारचाकी वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले होते़ चौघांवर तातडीने कारवाई करुन त्यांना १ जानेवारी रोजी न्यायालयात बोलावण्यात आले होते़ याठिकाणी त्यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली़ शहरात प्रथम ब्रेथ अ‍ॅनलायझरचा वापर करुन नवीन वर्षाच्या प्रारंभापूर्वीच चौघांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेशिस्तांची एकच धावपळ उडाली होती़ रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईचा धसका घेत अनेकांनी चोरटे मार्ग पकडून घर गाठले होते़दरम्यान कर्मचाऱ्यांकडून ३१ डिसेंबरला सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल ३४२ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली़ यात त्यांचे वाहन परवाने, दुचाकीची कागदपत्रे, पीयूसी नसल्याचे व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती़शहरात यापुढेही बेशिस्त व मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़