शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ढोल, ताशांचा निनाद आणि लेझीमची लय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोमवारपासून सुरू होणा:या गणेशोत्सवासाठी नंदुरबारच्या वेगळ्या धाटणीच्या लेझीमचा सराव युवकांकडून आणि गणेशमंडळ कार्यकत्र्याकडून सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोमवारपासून सुरू होणा:या गणेशोत्सवासाठी नंदुरबारच्या वेगळ्या धाटणीच्या लेझीमचा सराव युवकांकडून आणि गणेशमंडळ कार्यकत्र्याकडून सुरू आहे. रात्री उशीरार्पयत ढोल आणि ताशांच्या निनादात लेझीमचा सराव केला जात आहे.  नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्य हे एक वेगळेच आकर्षण असते. वेगळ्या धाटणीचे लेझीम नृत्य केवळ नंदुरबारातच पहावयास मिळते. त्यासाठी खास नृत्य बसविणारेदेखील शहरात आहेत. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे नृत्य केले जाते. त्यासाठीचा सराव सुरू झाला असून, गणेश मंडळाच्या कार्यकत्र्याची पावले लेझीमच्या तालावर थिरकू लागली आहेत. नंदुरबारची जशी वेगवेगळ्या संदर्भात खासीयत आहे, तसे नृत्याबाबतदेखील हे शहर प्रसिद्ध आहे. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीमनृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पावलीपासून 11 पावली लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत     जेवढीही मंडळे सहभागी होतात ते सर्व लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांची ही लेझीम     नृत्य पहाण्याचीही मजा काही औरच असते. पूर्वीच्या लेझीमनृत्यात व आताच्या लेझीमनृत्यात बराच बदल होत गेला असून आता केवळ त्याला हुल्लडबाजीचे स्वरूप येत आहे. मात्र काही तालीमसंघ आजही लेझीमची परंपरा टिकवून आहेत. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधीपासूनच त्याचा सराव सुरू केला आहे.पूर्वीपासूनची परंपरालेझीम नृत्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी ढोल-ताशांऐवजी संभळ वाद्यावर ती खेळली जात असे. त्याची वेगळीच लय राहत होती. कालांतराने मोठे आवाज करणारे ताशे, ढोल आले. त्यांनी संभळची जागा घेतली. ढोल व ताशांच्या आवाजामुळे नृत्यात अधिकच जोश येऊ लागल्यामुळे ही वाद्ये तरुणांच्या पसंतीस उतरली आणी संभळ मागे पडले. आज प्रत्येक मंडळात कमीत कमी पाच ते सात ढोल व तेवढीच ताशे आहेत. त्यांच्या ठेक्यावर आता लेझीम खेळली जाऊ लागली आहे.पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुका दोन ते अडीच   दिवस चालत असे. त्यामुळे मंडळातील कार्यकत्र्याचे गट करून ठरावीक वेळासाठी   ते लेझीम खेळत असत. त्यानंतर दुसरा गट   लेझीम खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शैली पहाण्याची मजाही येत असे. आता मात्र तसे राहिले नसल्याचे चित्र आहे.

सध्या डीजे, बॅन्जोचा जमाना असला तरी नंदुरबारातील गणेश मंडळांनी पर्यायाने तालीम   संघांनी लेझीमची परंपरा मात्र टिकवून ठेवली आहे. प्रत्येक मंडळ ढोल, ताशे यांच्याशिवाय दुसरे वाद्य वाजवित नसल्याचे चित्र आहे. काही तालीमसंघांनी तर खास लेझीम पथकेही तयार          केली आहेत. या पथकांना जिल्ह्यातूनही विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. लेझीम शिकविणारेदेखील शहरात अनेकजण आहेत. त्यांच्याकडूनच गणेश मंडळ कार्यकर्ते लेझीम शिकत असतात.

लेझीम नृत्याचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी लेझीम खेळणा:या व पहाणा:यालाही मजा येत असे. त्याचे विशिष्ट व लयबद्ध स्वरूप होते. तरुणीदेखील त्यात सहभागी होत असत. आता मात्र लेझीमचे स्वरूप हुल्लडबाजीचे झाले आहे. त्यामुळे लेझीम खेळणा:या तरुणींची संख्या  नसल्यासारखीच आहे. विसर्जन मिरवणुकीत खेळण्यात येणा:या लेझीमची पद्धतही बदलत चालली आहे.परंतु काही गणेश मंडळे ही परंपरा कायम टिकवून आहेत. नंदुरबारातील नवयुवक व्यायाम शाळा व संभाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे गोफ खेळण्यात येतो. विसजर्न मिरवणुकीत या गोफचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे गोफचा सरावदेखील मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.