शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

‘विजयरथ’ची डबल हॅटट्रीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:02 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बदललेल्या राजकीय समिकरणात ‘विजयरथ’ची घौडदौड कायम राखण्यात डॉ.विजयकुमार गावीत यांना यश ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बदललेल्या राजकीय समिकरणात ‘विजयरथ’ची घौडदौड कायम राखण्यात डॉ.विजयकुमार गावीत यांना यश आले. मतदारसंघात दुस:यांदा हॅटट्रीक करण्याचा मान त्यांना मिळाला. प्रचंड जनसंपर्क, केलेली विकास कामे आणि यंदा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मिळालेली साथ यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान डॉ.गावीत यांना मिळाला. योगायोग म्हणजे लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ.हिना गावीत यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात घेतलेला 70 हजारापेक्षा अधीकच लीड कायम राखला.  नंदुरबारची लढत तशी एकतर्फीच होती. परंतु उदेसिंग पाडवी यांनी ऐनवेळी केलेली एन्ट्री लढतीत टि¦स्ट निर्माण करून गेली. पाडवींना काहीतरी ‘करिश्मा’ होण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु डॉ.विजयकुमार गावीत यांनी केलेली विकास कामे, जोडलेले कार्यकर्ते, कन्या खासदार डॉ.हिना गावीत यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे आणि कट्टर विरोधक असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी युतीधर्माचे केलेले पालन यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.  प्रबळ विरोधक नसल्याने..आमदार डॉ.गावीत हे जिल्ह्यातील प्रस्थापीत नेते आहेत. नंदुरबार मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची पकड आहे. असे असतांना त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रबळ विरोधकच उरला नसल्याने त्यांचा विजय एकतर्फी राहिला. जर उदेसिंग पाडवी यांनी उमेदवारी केली नसती तर लाखाच्या फरकाने डॉ.गावीत यांचा विजय झाला असता यात कुणाचे दुमत होणार नाही.उदेसिंग पाडवींची चाचपणीउदेसिंग पाडवी यांना भाजपमध्ये स्थान राहिले नव्हते. अपक्ष लढण्यापेक्षा काँग्रेसमध्ये रघुवंशी यांची निर्माण झालेली पोकळी भरून निघावी आणि प्रस्थापीत पक्षात आपले असित्व राहावे या दुहेरी उद्दीष्टाने त्यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली. विशेष म्हणजे मतदारसंघात नवखे उमेदवार असतांना, मतदारसंघात कार्यकत्र्याची फळी नसतांना आणि प्रभावी प्रचार नसतांनाही त्यांनी 51 हजारापेक्षा अधीक मते घेणे ही बाब राजकीय दृष्टय़ा महत्त्वाची मानली जात आहे. डॉ.गावीत गटाला विरोधात गेलेली ही मते देखील दुर्लक्ष करून चालणार नाही हे देखील तेवढेच महत्त्वाचे. तापी पट्टय़ाची साथ कायमडॉ.विजयकुमार गावीत यांना यंदाही शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील तापी पट्टय़ाने पुरेपूर साथ दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या भागात त्यांचे वर्चस्व कायम आहे. नंदुरबार तालुक्यात रघुवंशी व त्यांच्यात विभागली गेलेली ताकद आता एकसंध राहणार असल्याने त्याचाही फायदा या दोन्ही नेत्यांना भविष्यातील राजकारणात होणार आहे. अर्थात यापूर्वीही या दोन नेत्यांचे ‘वेल्डींग’ झाले होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. आता हे वेल्डींग कसे आणि किती पक्के राहते हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.  अशी असेल राजकारणाची दिशानंदुरबार मतदारसंघातील विशेषत: नंदुरबार तालुक्यातील राजकारण आता बदलले दिसणार आहे. ज्यांना डॉ.गावीत व रघुवंशी यांची जवळीकता पसंत पडली नव्हती त्यांनाही आता जुळवून घ्यावे लागणार आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सहमतीचे राजकारण होऊन त्यांचे उमेदवार निवडून येणार आहेत. गावागावातील राजकारण देखील यामुळे बदलले असणार आहे. परंतु ज्यांना दोन दुकाने पाहिजे, त्याशिवाय त्यांची किंमत राहत नाही अशा नेत्यांची मात्र आता गोची ठरणार आहे.