शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पक्षापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. तयारी कशी करून यायची याचेही कानमंत्र त्यांनी दिले. दरम्यान, परिवार संवाद मेळाव्यात बोलतांना त्यांनी पक्षापेक्षा कुणी स्वत:ला मोठा समजत असेल तर त्याला पक्षाचा रामराम राहील असे सुनवत गटबाजी करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला मारला. राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोमवारी नंदुरबारात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांनी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी नंदुरबार, तळोदा-शहादा, नवापूर व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध बाबींची माहिती विचारली, काही पदाधिकारी यांना त्याची माहिती होती तर काही जण सांगतांना अडखळले. त्यामुळे त्यांनी पदाधिकारी यांना विविध टिप्स दिल्या. पक्षाचे संघटनात्मक काम करतांना कुठले मुद्दे आणि कशावर काम केले पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा. पक्ष सत्तेत असल्यामुळे सर्वसामान्यांची जास्तीत जास्त कामे करा. पद मिळाले म्हणजे आपण मोठे झालो असे समजू नका? नेहमीच कार्यकर्ता म्हणूनच काम केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केेले. शिवसेना, कॅांग्रेस सोबत आपण सत्तेत आहोत हे देखील नेहमीच लक्षात असू द्या असे त्यांनी सांगितले. सर्वच मतदार संघात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वत:ला मोठे समजू नका...विधानसभानिहाय आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुरज चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे,    महिला आघाडीच्या हेमलता शितोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे म्हणने ऐकुण घेतले. सहा जणांनी आपले म्हणने मांडले. त्यानंतर बोलतांना जयंत पाटील यांनी पक्षात गटबाजीला थारा नको, प्रत्येकाने आपला पक्ष म्हणून काम करावे. पक्षापेक्षा कुणी मोठे होत असेल, तसे समजत असेल तर त्यांना पक्षात जास्त दिवस थांबता येणार नाही. त्यांनी राम राम घेतला तरी चालेल असेही त्यांनी सांगितले. पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने वेळ द्यावा. प्रत्येक सेलची कार्यकारिणी गठीत करतांना सर्वसामावेशक अशी करावी. मेळावे, बैठका यांना प्रत्येकाने उपस्थित राहावे. वरिष्ठांच्या सुचनांचे पालन करावे असे सांगून बूथ लेव्हलला काम करावे. संघटनात्मक काम करतांना सुक्ष्म नियोजन करूनच काम करावे असे आवाहन त्यांनी केले. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केेले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाची माहिती सादर केली व पक्ष वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

प्रदेशाध्यक्षांनी साधला आदिवासी भाषेत संवाद... परिवार संवाद यात्रेनिमित्त सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातून कार्यकर्ते आले होते. त्यातील काहींना भाषेची अडचण येत होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिलोरी भाषेत त्यांच्याशी काही काळ संवाद साधला. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनाही हायसे वाटले. जिल्हाभरातील पुरुष व महिला कार्यकर्तींसह युवक वर्गही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. दुपारी १ वाजेपासून कार्यकर्ते येथे दाखल झाले होते. प्रत्यक्षात तीन वाजता कार्यक्रम सुरू झाला.