शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली असली तरी मद्य शौकिनांमध्ये कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली असली तरी मद्य शौकिनांमध्ये कोरोना लसीनंतर मद्य सेवन करावे की नाही याबाबत भीती पसरली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते मद्यसेवनाविषयी सल्ला घेण्यास ही मंडळी सामाजिक धाकाने बिचकतात. तथापि, मद्यसेवनाचे परिणाम माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लसीकरणानंतर दोन आठवडे ते महिनाभर तरी मद्यपान करू नये, असे म्हटले जाते.

कोरोना या जागतिक महामारीवर प्रतिबंधात्मक लस नागरिकांना देण्याची तिसऱ्या टप्प्याची मोहीम केंद्र शासनाकडून गेल्या १ एप्रिलपासून हाती घेतली आहे. जिल्ह्यात आतापावेतो या वयोगटातील २५ हजार नागरिकांनी ही लस घेतल्याचे म्हटले जाते. परंतु या प्रतिबंधात्मक लसीनंतर मद्यसेवन करायचे की नाही, असा प्रश्न शौकिनांमधून उपस्थित केला जात आहे. किती दिवसांनी मद्यपान करायचे याबाबतही शौकिनांना चिंता सतावत आहे.

मद्यात अल्काेहोलचे अधिक प्रमाण असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. लस प्रतिकार शक्ती वाढवते. साहजिकच परिणाम होण्याची शक्यता असते. मद्यामुळे शरीरावर प्रतिगामी परिणाम होऊ शकताे असे तज्ज्ञांचे मत आहे. लसीकरणानंतर एक महिना, १५ दिवस तरी मद्यपान करू नये असे म्हटले जाते. पण याविषयी काय गाईडलाईन्स आहेत त्याबाबत मद्यशौकीन अनभिज्ञ असल्याने ते गोंधळलेले असल्याचे सांगितले जाते. लस घेतल्यानंतर किती दिवसांनी मद्यपान करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर काय खाऊ काय खाऊ नये, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहेत.

मद्यपान हानिकारक

तसे मद्यपान करणे माणसाला हानिकारक आहे. कारण आरोग्याला त्याची क्षती पोहचत असते. तरुण वयात शौक म्हणून सुरू केलेले मद्यपान कालांतराने नियमित व्यसन बनून आपल्या आरोग्याबरोबर संसाराची राखरांगोळी करते. अशी अनेक उदाहरणे घडलेली आहेत. या कोरोना महामारीच्या काळात तरी मद्यपान करणे टाळले पाहिजे, कारण त्याचा वाईट परिणाम शरीरावर पडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, या काळातच मद्याच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या जात असल्याची चर्चा आहे. मद्यशौकिनांना लॉकडाऊन लागू राहावे अथवा नाही याचे सोयरसुतक नाही.

लसी केंद्रांवर सूचना द्याव्यात

शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन उपजिल्हा रुग्णालय अथवा ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामार्फत केले आहे. जेव्हा पात्र लाभार्थी अशा केंद्रावर लस टोचून घेतात तेव्हा त्यांना लस घेतल्यानंतर काय खावे, काय खाऊ नये, शिवाय मद्यपान करण्याबाबत काहीच सूचना दिल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात लसीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. निदान वरिष्ठ आरोग्य प्रशासनाने तरी या प्रकरणी सूचना द्याव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोट

लसीनंतर मद्यपान केले तर शरीरामध्ये त्याचे आमूलाग्र बदल होऊन त्याची रिॲक्शन होऊ शकते. श्वसनाचा त्रास, शरीरावर लाल चट्टे येऊ शकतात, शिवाय अचानक शरीराला कंप सुटून बेशुद्ध होऊ शकतात. त्यामुळे मद्यपान टाळणेच उत्तम राहील.

-डॉ. योगेश्वर चौधरी, एम. डी. फिजिशियन, जे. जे. हॉस्पिटल, मुंबई

कोट

कोरोना प्रतिबंधात्मक लस इम्युनिटी वाढविण्यावर परिणाम करते. परंतु मद्यात अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्यामुळे इम्युनिटी कमी होते. साहजिकच मद्यपानामुळे लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने निदान ते महिनाभर तरी टाळले पाहिजे.

-डॉ. गौरव तांबोळी, एम. डी. मेडिसीन, नंदुरबार.