शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जास्त बाधित आढळणाऱ्या गावात घरोघर सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

शहादा : कोरोनाबाधित रुग्ण जास्त संख्येने आढळणाऱ्या गावाला आरोग्य पथकामार्फत घरोघरी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. बाधितांच्या संपर्कात असलेल्यांना ...

शहादा : कोरोनाबाधित रुग्ण जास्त संख्येने आढळणाऱ्या गावाला आरोग्य पथकामार्फत घरोघरी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. बाधितांच्या संपर्कात असलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. त्याचप्रमाणे तपासण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर कथा प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली.

तालुक्यातील फत्तेपूर येथे केंद्रीय पथकाचे प्रतिनिधी तथा संसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. फत्तेपूर गावात गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत असल्याने या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत आजपर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत यापुढे काय करावे, याच्या सूचना केल्या.

पॉझिटिव्ह रिझल्ट आला, मात्र कुठलीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर विलगीकरणगृहात आयसोलेटेड केले जाईल. प्रथम टप्प्यात ५० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० असे १०० ऑक्सिजन बेड कार्यान्वित केले जातील. खाजगी रुग्णालयांकडे ११५ ऑक्सिजन बेडची संख्या आहे. मोहिदा शिवारात ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू असून कोइम्बतूर येथून मशिनरी मागविण्यात आली आहे. तो लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. विलीनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असून शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये खाजगी डॉक्टरांची उपचारासाठी मदत घेतली जाणार आहे. तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजित पाटील उपस्थित होते.