शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी दिवाळीत वेटींग कमी प्रत्येकाला जागा मिळण्याची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:57 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे कमी झालेली रेल्वेप्रवाशांची संख्या पुन्हा वाढत असून गुजरातसह उत्तर भारतात जाणा-या प्रवाशांना सहज ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे कमी झालेली रेल्वेप्रवाशांची संख्या पुन्हा वाढत असून गुजरातसह उत्तर भारतात जाणा-या प्रवाशांना सहज आरक्षण मिळत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर आहे. रेल्वेच्या आरक्षण चार्टमध्ये सीट्स उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्याने दिवाळीत गावी जाणारे आणि गावाहून परतणा-यांना मोठा दिलासा मिळाला होता. सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावरुन आठवडाभरात १५ गाड्या चालवण्यात येत आहेत. या प्रवासी एक्सप्रेस गाड्यांपैकी तीन गाड्या दररोज मार्गस्थ होत असून उर्वरित १२ प्रवासी गाड्या ह्या आठवड्यातील सातही दिवस निर्धारित वेळेनुसार गाड्या चालत आहेत. साप्ताहिक गाड्या वगळता नियमित चालवण्यात येणा-या तीन गाड्यांपैकी गुजरातकडे जाणा-या सर्व गाड्यांना आरक्षण मिळत असल्याचे दिसून आले आहे. लांबचा पल्ला गाठून येणा-या गाड्यावेळोवेळी रिकाम्या होत असल्याने नंदुरबारात येईपर्यंत अहमदाबादकडे जाणा-यांना सहज बुकींग मिळत असल्याचे चित्र आहे. सोबत उत्तर भारतातील शहराकडे जाणा-या प्रवाशांनाही बुकींग मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने नागपूर पर्यंतचे आरक्षण मिळणे काहीअंशी जड जात असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. यामुळे काहींचा प्रवासही लांबला आहे. 

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्लसुरत-वाराणसी ताप्तीगंगा एक्सप्रेस, हावडा व छपरा या तीन गाड्याच सध्या सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजा असल्याने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. यामुळे नागपूर पर्यंत जाण्यासाठी अनेकांना वेटींग करावे लागले. येत्या १ डिसेंबरपर्यंत या गाड्यांना आरक्षण आहे. 

जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढरेल्वेच्या एकूण सहा फे-या ह्या दैनंदिन असल्या तरी उर्वरित २४ फे-या ह्या विविध दिवशी होत आहेत. यातून त्या-त्या मार्गावरील प्रवाशांना ठराविक दिवशी गावी जाण्याचे नियोजन करावे लागत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे. यामुळे ब-याचवेळा रेल्वे स्थानकात शुकशुकाट असतो. परंतू गाडी येण्याच्या वेळी मात्र गर्दी असते.