शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नंदुरबार : इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने जिल्हाभरात आंदोलन केले. नंदुरबारात बैलगाडीवर दुचाकी ठेऊन रॅली काढण्यात आली. शहादा, नवापूर, तळोदा, ...

नंदुरबार : इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने जिल्हाभरात आंदोलन केले. नंदुरबारात बैलगाडीवर दुचाकी ठेऊन रॅली काढण्यात आली. शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे देखील आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आज शिवसेनेने नवापूरात निदर्शने केली. पेट्रोल आणि डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई देखील वाढली आहे. सामान्यांना प्रवास करणे आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. या दरवाढी विरोधात जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारसह जिल्हाभरात आंदोलन झाले.

नंदुरबार येथील आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख दीपक गवते, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, सुनील सोनार, गजेंद्र शिंपी, पंडित माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नेहरु चौकात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

नवापूर

नवापूर शहरात उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, शिवसेना नगरसेविका अरूणा पाटीलसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

शहादा

शहादा येथे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून केंद्र शासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे यांना निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांनी निवेदन स्वीकारले. सायकल रॅलीत उपजिल्हाप्रमुख प्रा. सखाराम मोते, शहरप्रमुख रोहनकुमार माळी, संघटक मधुकर मिस्तरी, माजी नगरसेवक विनोद चाैधरी, सागर पाटील, इद्रीस मेमन, दिलीप पाटील, बापू चाैधरी, प्रवीण सैंदाणे, उत्तम पाटील, सोमेश्वर सोनार, मनोज सोनार, निलेश पाटील. सागर चाैधरी, प्रकाश तिरमले, गणेश चित्रकथे, प्रशांत नायक, विवेक भावसार, राजू लोहार, पंडित माळी, गुलाब सुतार, सुरेश मोरे, भगवान अलकरी, प्रवीण बोरदेकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

तळोदा

शिवसेनेतर्फे तळोदा येथील तहसीलदार गिरीश वाखारे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर तळोदा शहर शिवसेना प्रमुख जितेंद्र दुबे, जिल्हा उपप्रमुख रुपसिंग पाडवी, तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, युवासेना शहरप्रमुख जगदीश चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल, शहर संघटक विनोद वंजारी, माजी उपनगराध्यक्ष गौतमचंद जैन, तालुका संघटक प्रमुख आकाश पाडवी, उपतालुका प्रमुख दिलवर पाडवी, काशिनाथ कोळी, युवासेना उपशहर प्रमुख श्रावण तिजवीज, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक मोरे, महेंद्र गुरव, सागर वाणी, विजय मराठे, नितू सोनार, नितीन ठाकरे, गणेश चित्रकथे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.