शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

सायबर क्राईमबाबत जिल्हा ‘सेफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात सायबर चोर सक्रीय झाले असतांना, कोरोना संदर्भात विविध अफवा व तेढ निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात सायबर चोर सक्रीय झाले असतांना, कोरोना संदर्भात विविध अफवा व तेढ निर्माण करण्याचे प्रकार सोशल मिडियावर सुरू असतांना नंदुरबार मात्र त्यापासून ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे चित्र आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत केवळ दोनच सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झाले आहेत.लोकांच्या घरी बसण्याचा फायदा, इंटरनेट व सोशल मिडिया वापरण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता लॉकडाऊनच्या काळात सायबर चोरटे सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसात राज्य व देशात आॅनलाईन फसवणूक व इतर बाबींचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. परंतु नंदुरबार त्यापासून दूर असल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे सोशल मिडियाद्वारे कोरोना संदर्भात अफवा पसरविणे, कोरोना संशयीत रुग्णाची कागदपत्रे सार्वजनिक करणे, जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीेने मेसेज व्हायरल करणे, प्रशासनाच्या उपाययोजनांना तडा जाईल अशा पद्धतीने चुकीची माहिती प्रसारित करणे आदी प्रकारचे सायबर गुन्हे गेल्या काळात वाढले होते. परंतु पोलिसांनी अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, व्हॉट्सअप गृपच्या अ‍ॅडमीनला जबाबदार धरणे आदी प्रकारच्या कारवाई सुरू केल्याने जिल्ह्यात या गुन्ह्यांवरही मर्यादा आली.अनेक गृप अ‍ॅडमीन यांनी सेटींग बदलून व्हॉट्सअप गृपवरील मेसेज नियंत्रणात आणले. परिणामी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अवघ्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत व्हॉट्सअपवरील एक आणि फेसबूकवरील एक अशा दोन मेसेजमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.पहिला गुन्हा जळगाव येथील कोरोना रुग्णाचे कागदपत्र व्हॉट्सअप गृपवर शेअर केल्याने नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दुसरा गुन्हा फेसबूकवर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती केल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.