शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल उद्दिष्टपूर्तीत जिल्हा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत नंदुरबार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्या राज्यातील अन्य पंचायतींच्या तुलनेत आघाडीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत नंदुरबार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्या राज्यातील अन्य पंचायतींच्या तुलनेत आघाडीवर राहिल्या आहे. त्यात अक्कलकुवा पहिल्या स्थानावर तर शहादा तालुकापाचव्या स्थानावर आहे. याबद्दल तिन्ही गटविकास अधिका:यांना 20 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार           आहे.शासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणा:या प्रधानमंत्री आवास योजनेत नंदुरबार जिल्ह्याने मोठी कामगिरी केली आहे. त्यात धडगाव, तळोदा व नंदुरबार पंचायत समित्या वगळता उर्वरित तिन्हीसमित्यांचे काम जोरात राहिले आहे. पंचायत समिती शहादा तालुक्यात 2016 -17 व 2018 - 19 या वर्षात जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. राज्यात अक्कलकुवा तालुका पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्यानुसार शहादा पंचायत समितीला पंधरा हजार 459 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी पाच हजार 198 घरकुले पूर्ण केली आहे. त्यामुळे घरकुलाच्या उद्दिष्टपूर्तीत शहादा पंचायत समिती राज्यात पाचव्या स्थानावर राहिली आहे. दुस:या स्थानी शहापूर, तिस:या स्थानी  नवापूर, चौथा साक्री, पाचव्या    स्थानी शहादा तर सहाव्या  क्रमांकावर गोंदिया असे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उद्दिष्टपूर्तीत उल्लेखनीय कामगिरी करणा:या पंचायत समित्यांच्या गटविकास अधिका:यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यात शहादा पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी गोस्वामी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे प्रधान  सचिव असीम कुमार गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहादा तालुका घरकुल लाभाथ्र्यांचे आधार फीडिंग कामासह अकाउंट व्हेरिफिकेशनमध्येही आघाडीवर राहिला.चालू वर्षातील 2019 - 20 घरकुलांचे उद्दिष्ट आठ हजार 92 असून त्याचीही शंभर टक्के मंजुरी झाली.