शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ओल्या दुष्काळाची किनार तरीही वाढीव पैसेवारीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात तीन वर्षापासून निर्माण झालेला दुष्काळ जावून सुकाळ परतल्याचे चित्र निर्माण झाले आह़े परंतू याला सप्टेंबर अखेरीस झालेल्या अतीवृष्टीचीही किनार असल्याने शेतकरी ओल्या दुष्काळाला सामोरे जात असल्याचेही चित्र जिल्ह्यात आह़े    प्रशासनाने नुकतेच हंगामी पैसेवारी जाहिर केली आह़े यात नंदुरबार तालुक्यातील 145, नवापुर 165ख तळोदा 94, शहादा 160, धडगाव 99 तर अक्कलकुवा तालुक्यातील 194 गावे ही सुस्थितीत असून या प्रत्येक गावातील शिवारात पिकांची स्थिती मजबूत असल्याने पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे घोषित झाले आह़े नजर पैसेवारीतही हीच स्थिती होती़ यातून प्रशासनाने आढावा घेत हंगामी पैसेवारी घोषित केली आह़े येत्या डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारीची आकडेवारीही कायम राहिल असा अंदाज बांधला जात आह़े परंतू सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 19 हजार बाधित शेतक:यांच्या भरपाईबाबत कारवाईच झालेली नसल्याने त्यांच्यावर ओल्या दुष्काळाची कु:हाड कोसळणार आह़े कोरड क्षेत्रात 12 हजार 991 शेतक:यांच्या  7 हजार 440 तर 7 हजार 164 बागायतदार शेतक:यांच्या 5 हजार 661 शेतीपिकांना अतीवृष्टीची झळ बसली होती़ या पिकांचे पंचनामे पूर्ण करुन शासनाकडे भरपाईच्या 42 कोटी रुपयांचा प्रस्तावही देण्यात आला आह़े परंतू त्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याने शेतकरी नुकसानीच्या गर्तेत आहेत़ यातून मार्ग निघत नसल्याने शासनाने जाहिर केलेल्या पैसेवारीवर समाधान करण्याऐवजी शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत़ 

857 खरीप आणि 30 रब्बी गावांचा आढावा प्रशासनाने घेतला आह़े अद्याप अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात आलेली नसल्याने पुढील कारवाई बाकी आह़े जिल्ह्यात अतीवृष्टीबाबत झालेल्या पंचनाम्यांबाबत शेतक:यांनी तक्रारी केल्या होत्या़ शेतक:यांनी सांगूनही त्यावेळी तलाठी व मंडळाधिकारी यांनी पंचनामे न केल्याने अनेकांना भरपाईपासून मुकावे लागण्याची शक्यता आह़े यामुळे जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा आढावा पुन्हा नव्याने घेऊन भरपाईचे नवीन प्रस्ताव देण्याची मागणी करण्यात येत आह़े