शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात चिकन व अंडी विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश , २२ पोल्ट्री केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन भोपाल येथुन रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्ल्यू ...

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन भोपाल येथुन रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्ल्यू आहे की नाही हे स्पष्ट करणार आहे. शहरात चिकन व अंडी विक्रीवर बंदी केल्याने व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली रिपोर्ट आला नाही तर बंदी कशी असा सवाल उपस्थित केला.

नवापूर शहरातील २६ पोल्ट्रीमध्ये दररोज कोंबड्याच्या मरण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने आज नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, व्होरा पोल्ट्री फॉर्म मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांत अधिकारी वसुमना पंत, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यादरम्यान व्यवसायिकांना काही उपाय योजना संदर्भात सूचना केल्या आहेत. शहरातील सर्व पोल्ट्री फार्म सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने महसूल, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. यादरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी व्होरा पोल्ट्री फार्म येथे सर्व कागदपत्रांची पाहणी केली व पोल्ट्री व्यवसायिकांना काही उपयोजनात्मक सूचना केल्या आहेत. नवापुर तालुक्यातील ११ पक्ष्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. त्यानंतर तेथून भोपाल येथे अहवाल पाठवण्यात येईल. बर्ड फ्लू आहे की नाही हे भोपालचा अहवाल आल्यानंतरच जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत शहरातील पोल्ट्री फार्म, पोल्ट्री व्यावसायिक, स्थानिक अधिकारी, पशुसंवर्धन, महसूल, पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.

नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागाचे पथक नवापूर शहरात दाखल झाले आहे. त्यांची निवासाची व्यवस्था नवापूर सीमा तपासणी नाक्यावर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हालचल सुरू झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

नवापूर तालुक्यातील एकूण २८ पोल्ट्री फार्म असून २६ पोल्ट्री मध्ये एकूण ९ लाख ४ हजार ४९८ कुकुट पक्षी आहेत. आज दिवसभरात ३६६४ पक्षी मेली आहे