शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार सीडबॉल व रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्याचे नगराध्यक्ष व शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मोतीलाल पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहाद्याचे नगराध्यक्ष व शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील कै.डॉ. विश्राम काका शैक्षणिक संकुलात सामाजिक व पर्यावरणपूरक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, नंदुरबार वन विभाग शहाद्याचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजित पाटील, प्रीती पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. गिरासे म्हणाले की, शासन स्तरावर वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. परंतु लावलेले वृक्ष जगवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने पुढाकार घेतला पाहिजे. वयाच्या ७५ व्या वर्षीही पर्यावरण जगवण्यासाठी मोतीलाल पाटील यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. उतरत्या वयातही कोविड काळात प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करून प्रशासनालाही मोठी मदत केली, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले. एस.बी. केवटे, तहसीलदार डॉ. कुलकर्णी, दीपक बुधवंत, किशोर हडपे यांनीही मनोगत व्यक्त केले.शैक्षणिक संकुलात दुपारच्या सत्रात वृक्षारोपण, तुलादान, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वने व पर्यावरण वर्धिष्णू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांच्या १ हजार १७५ रोपांचे वितरण व ११ हजार सीड बॉलचे वितरण करण्यात आले. यावेळी १६ पथके नेमण्यात आले. ही सर्व पथके सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात ज्या ठिकाणी वृक्षराजी नष्ट झाली आहे अशा जागेवर सीड बॉल टाकण्यात आले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला पाहून हा उपक्रम प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.