शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे चेतक फेस्टीवलचा निधी रोखण्यासाठी सरकारसोबत चर्चा करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:25 IST

पत्रपरिषद : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तीन तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे चेतक फेस्टीवलसारखे उत्सव हे लोकसहभागातून झाले पाहिजेत़ त्यासाठी शासन खर्च करत असेल तो निधी रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करु अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़  भाजपाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यासाठी रविवारी प्रदेशाध्यक्ष दानवे हे नंदुरबारात आले होत़े यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली़ प्रसंगी बोलता ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरे सुरु आहेत़ दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात आह़े लोकसभा निवडणूकांसाठी कार्यकर्ते सक्रीय व्हावेत असा या दौ:याचा उद्देश आह़े नंदुरबार जिल्हा भाजपात गटबाजी असल्याचे सांगण्यात येत असले तरी पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही आणि असेल तर पक्षीय स्तरावर ती पाहून घेऊ असे सांगून दाने यांनी गटबाजीच्या मुद्दय़ाला बगल दिली़ सारंगखेडा येथे होणा:या चेतक फेस्टीवलसाठी पर्यटन विभागाकडून दिल्या जाणा:या निधीबाबत प्रश्न उपस्थित झाला असता, ते म्हणाले की, तीन तालुके दुष्काळी आहेत़ या पाश्र्वभूमीवर होणारे उत्सव हे पारंपरिक असल्याने ते लोकसहभागातून घेतले गेले पाहिजेत़ त्यावर शासन काय खर्च करते आहे, हे पाहून खर्च कमी करणे किंवा तो रोखण्यासाठी शिफारस करणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े भाजपाच्या राममंदीर मुद्दय़ाचे समर्थन करताना हा मुद्दा स्वागतार्ह असल्याचे सांगून शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने त्यांची युती ही मतांचे विभाजन टाळण्यासाठी गरजेची आह़े युती व्हावी असाच भाजपाचा प्रयत्न राहणार आह़े नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळ निवारण आणि सिंचन प्रकल्प वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे लक्ष घालावे असेही सुचवणार असल्याचे ते शेवटी म्हणाल़े पत्रकार परिषदेस पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपाच्या जिल्हाध्यक्षा तथा खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, संघटनमंत्री विजय पुराणिक, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होत़े