शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्टी फर्स्ट’ला शिस्तीचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील रस्त्यांवर ३१ डिसेंबरला मद्यपान करुन भरधाव वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर यंदा कठोर कारवाई करण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील रस्त्यांवर ३१ डिसेंबरला मद्यपान करुन भरधाव वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर यंदा कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस दलाने दिले असून जागोजागी पॉर्इंट उभारुन वाहनचालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’ने चाचणी करण्याची तयारी करण्यात आली आहे़ वाहतूक शाखेसोबत दारुबंदी विभागानेही पथकांची निर्मिती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्ह्यातील विविध भागात नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येते़ यानिमित्त महामार्ग, राज्यमार्गासह ग्रामीण भागात मद्यपान करुन वाहन चालवणारे सर्रास आढळतात़ यातून गंभीर अपघात होऊन काहींना जीवही गमवावा लागला आहे़ या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून आठ दिवसांपासून जनजागृती करण्यात येत आहे़ ३१ डिसेंबरच्या रात्री दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यासाठी वाहतूक शाखेच्या अद्ययावात वाहनातील ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे तपासणी करुन वाहने सोडण्यात येणार आहेत़वाहनधारकांवर कारवाईची तयारी सुरु असताना जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत अवैध मद्यावर कारवाई करण्यात येत आहे़ यांतर्गत सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने टेंभे ता़ शहादा येथे २ हजार ४०० रुपयांची गावठी दारु नष्ट करुन भाऊसाहेब पानपाटील याच्यावर कारवाई करण्यात आली़शहादा पोलीसांच्या पथकाने वाघार्डे येथे २ हजार ९०० रुपयांचे गावठी मद्य नष्ट करुन गोटा शिकत्या पावरा याच्यावर कारवाई करत नोटीस बजावली़नंदुरबार शहर पोलीसांच्या पथकाने भोणे शिवारातील पमण रमण भिल याच्यावर कारवाई करत १ हजार रुपयांची हातभट्टीची दारु जप्त करुन नष्ट केली़नंदुरबार तालुका पोलीसांनी आसाणे येथे १ हजार रुपयांची गावठी दारु नष्ट करुन युवराज भिल याच्यावर कारवाई केली़ तळोदा पोलीसांनी रोझवा येथे १ हजार ३८० रुपयांचा माल जप्त करत किरता पाडवी याच्यावर कारवाई केली़ विविध भागात सध्या अवैध मद्यावर कारवाई करण्यात येत आहे़३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्रीची दुकाने तसेच बियर बार यांना दुकानांच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे़ ३१ च्या रात्री परवानाधारक दुकानांमध्ये रात्री १ वाजेपर्यंत मद्य विक्री होऊ शकते़ यानंतर मात्र ही दुकाने बंद होणार आहेत़ उत्पादन शुल्क विभागाकडून १ डिसेंबरपासून जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर कारवाई सुरु आहे़ यांतर्गत पथकांची नियुक्ती करुन परवाने आणि स्टॉक तपासणीचे काम सुरु असल्याची माहिती आहे़ ३१ डिसेंबरच्या रात्रीही ही पथके शहरी आणि ग्रामीण भागात भेटी देऊन लक्ष ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़