शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फी-माफीला विद्यार्थी पात्र तरीही कॉलेज मागतंय दुष्काळी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार तालुके आणि एका तालुक्यातील तीन मंडळातील भिषण दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शालेय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चार तालुके आणि एका तालुक्यातील तीन मंडळातील भिषण दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शालेय व महाविद्यालयीन फी माफीचा निर्णय शासनाने घेतला होता़ शालेय स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी होत असली तरी महाविद्यालये मात्र विद्याथ्र्याना वेठीस धरत आहेत़ गेल्या हंगामात 67 टक्के पावसाची नोंद झाल्याने नंदुरबार, नवापुर आणि शहादा हे तीव्र तर तळोदा तालुका मध्यम दुष्काळी म्हणून घोषित झाला होता़ अक्कलकुवा तालुक्यातील खापर, मोरंबा आणि अक्कलकुवा ही तीन मंडळेही कालांतराने दुष्काळी घोषित करण्यात आली होती़ दुष्काळी म्हणून जाहिर झालेल्या या तालुक्यांसाठी आठ प्रकारच्या सवलती शासनाने घोषित केल्या होत्या़ यात शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्याचे सांगण्यात आले होत़े 2018-19 आणि 2019 या दोन शैक्षणिक सत्रातील ही माफी होती़  जिल्ह्यात 2018-19 या वर्षात दहावी आणि बारावी वर्गात शिकणारे 47 हजार विद्यार्थी या सवलतीला पात्र ठरले होत़े  जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 47 हजार 700 विद्याथ्र्याच्या याद्या बोर्डाकडे पाठवून ते दुष्काळी असल्याचे स्पष्ट केले होत़े यातून त्यांचे परीक्षा शुल्क खात्यावर परत येणार आह़े दुसरीकडे जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण देणा:या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना मात्र ही सवलत मिळूनही ते त्यापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आह़े अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, डीएड व बीएड तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये शिकणा:या विद्याथ्र्याकडून त्या-त्या महाविद्यालयाचे प्रशासन ‘दुष्काळी गावाचा रहिवासी’ असल्याचे प्रमाणपत्र मागत आहेत़ तहसीलदार किंवा तत्सम अधिकारी  यांच्याकडून असे कोणतेही प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याने विद्याथ्र्याची फी-माफी अधांतरी लटकली आह़े गेल्या वर्षासह यंदाच्या वर्षातील सत्रनिहाय परीक्षा शुल्क विद्याथ्र्याना माफ होणार असल्याने या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली आह़े ग्रामीण भागातील किमान 20 हजारच्या जवळपास विद्यार्थी या सवलतीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा देणा:या विद्याथ्र्याचे 410 रुपयांचे परीक्षाशुल्क माफ करण्यात आले आह़े ही रक्कम विद्याथ्र्याच्या खात्यावर लवकरच जमा होणार आह़े अकरावीचे 16 हजार 240, बारावीचे 12 हजार 935 आणि दहावीच्या 19 हजार 955 विद्याथ्र्याचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने दिले होत़े पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 42 हजार 200 तर दुस:या टप्प्यात 4 हजार 700 विद्याथ्र्याची नावे बोर्डाकडे फी माफीच्या सवलतीसाठी पाठवली गेली होती़ या सर्व विद्याथ्र्याना शैक्षणिक परीक्ष ुशुल्क माफ करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आह़े  अभियांत्रिकी पदवी आणि पदविका, औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका, बीएड आणि डीएडसह इतर शाखांमध्ये शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याची परीक्षा सत्रानुसार घेतली जात़े गेल्या वर्षात झालेल्या परीक्षांची शुल्कमाफी व्हावी म्हणून विद्यार्थी वारंवार महाविद्यालयात चकरा मारत आहेत़ यासाठी संबधित महाविद्यालयांकडून विद्याथ्र्याना नकार देत प्रमाणपत्र आणावे असे सुचवले जात आह़े याबाबत काही विद्याथ्र्याच्या पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी शासनाचे आदेश हेच प्रमाणपत्र असल्याचे सूचित केले होत़े यानंतरही विद्याथ्र्याची शुल्कमाफी झालेली नाही़