शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्याचा जिल्ह्यासोबत संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आह़े शनिवारी रात्रीपासून अचानक पावसाचा जोर वाढल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धडगाव : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आह़े शनिवारी रात्रीपासून अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीनाल्यांना पूर येऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आह़े धडगाव तालुक्याकडे येणारे सर्व रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्हा मुख्यालयापासून तालुक्याचा संपर्क तुटला आह़े तालुक्यात 23 जुलैपासून संततधार पाऊस सुरु आह़े यात 3 ऑगस्टपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती़ शनिवारी रात्रीत जोर वाढल्याने पालखा, राडीकलम, जर्ली येथील घरांमध्ये उदय नदीचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता़ रविवारी सकाळी उदय नदीला पूर आल्याने धडगाव ते रोझरीपाडा दरम्याच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने धडगाव पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केली होती़ तसेच पालखा येथून पाणी आल्याने तळोदा ते धडगाव दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती़ पुराच्या पाण्यामुळे जर्ली येथील अमरसिंग पावरा यांची नदीकाठावरील शेतजमिन पिकांसह वाहून गेली़ ज्वारी आणि कापसाचे पिक वाहून गेल्याने शेतक:याचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होत़े तालुक्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र थोरे यांच्यासह पोलीस निरीक्षक गवळी यांनी जागोजागी भेटी देत पाहणी केली़ तहसीलदार कार्यालयाकडून मंडळाधिकारी आणि तलाठी यांना तातडीने पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ प्रशासनाकडून सोमवारी पंचनामे सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े