शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरावर उपनिबंधकाच्या पथकाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातील दोन संशयित सावकाराच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील पथकाने झडती घेतली. झडतीमध्ये मोठे घबाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  शहरातील दोन संशयित सावकाराच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील पथकाने झडती घेतली. झडतीमध्ये मोठे घबाड काय हाती लागल्याची माहिती आहे. पथकाकडून उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. तक्रारीवरून गुरुवारी सकाळपासून चौकशी करण्यात आली होती.नवापूर शहरातून चार वेगवेगळ्या तक्रारदारांनी संशयित सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार एकाने १२ लाख, एकाने ५ लाख, तर एकाने दोन लाख रुपये संशयित सावकारी करणाऱ्याकडून व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी तिघांकडून १० टक्के व्याज वसूल करण्यात येत होती. पैसे देण्यास विलंब झाल्यास शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी दिली जात होती. या तक्रारीच्या आधारे गुरुवारी नंदुरबार येथील प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख रणजित पाटील, सहकार अधिकारी रत्ना मोरे, प्रकाश खैरनार, सुनंदा सामुद्रे, संगीता कोळी, कुंती पाडवी, हेमंत मरसाळे, शासकीय पंच सखाराम चौधरी, रुस्तम वसावे, किशोर पटेल यांनी नवापूर येथील संशयितांच्या घरी झडती सुरू केली. यादरम्यान संशयितांच्या घरातून एक कट्टा, रोख रक्कम, महत्त्वाचे दस्तावेज जमा करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनाम करण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनाम्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची दिवसभर नवापूर शहरात चर्चा रंगली होती. शहरात एका आठवड्यात दोनवेळा तीन ठिकाणी घराची झाडाझडीत घेण्यात आल्याने अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. शहरात कोट्यवधी रुपयांच्या रक्कम सावकारीतून वाटप करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवापुरात चार जणांकडे परवानेनवापूर शहरात केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तिघांनी परवाने नूतनीकरण केले आहे. एकाचा परवाना नूतनीकरण करण्याचे काम शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान. नंदुरबार जिल्ह्यात कोणी सावकार शेतकरी किंवा नागरिकांना कर्ज दिले असेल व कर्जाचा रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करत असेल तर अशा सावकारांविरुद्ध नंदुरबार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी केले आहे.