शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्याच्या उपनगराध्यक्षा बसल्या पालिकेत उपोषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी ह्या प्रभाग क्रमांक एकचे नेतृत्व करतात. त्यांनी आपल्या प्रभागातील खर्डी नदीवर संरक्षक भिंत बांधणे, ...

येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी ह्या प्रभाग क्रमांक एकचे नेतृत्व करतात. त्यांनी आपल्या प्रभागातील खर्डी नदीवर संरक्षक भिंत बांधणे, आमराईफळीत काँक्रिटीकरण, दलेलपूर पुलाजवळ अमरधाम बांधणे अशी एकूण साधारण साडेसहा कोटीच्या कामांचे इस्टिमेट तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी गेल्या तीन वर्षांपासून पालिकेत सादर केले आहे. तथापि, त्यास अजूनही तांत्रिक मान्यता देण्यात येत नाही. तांत्रिक मान्यतेसाठी पालिका फंडात पैसे नसल्याचे कारण नेहमी पुढे केले जात असते. वास्तविक माझा प्रभाग हा खर्डी नदीलगत असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असते. त्यामुळे ही कामे प्राधान्याने घेण्याची आवश्यकता आहे. तथापि, निधीची सबब पुढे करून आजतागायत टाळण्यात येत आहे. भांडार विभागात विविध वस्तू दुप्पट किमतीत खरेदी करण्यात येतात. त्यावेळी पालिका फंडात पैसा असतो. मात्र माझ्या प्रभागातील विकास कामांनाच पैसा नसतो. केवळ दुजाभाव केला जात असल्यामुळेच आडकाठी आणत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याशिवाय काॅलेज चौफुलीपासून आंबेडकर चौकाच्या नाल्यावर अंडर ग्राउंड गटारचा ठरावसुद्धा घेतला होता. तीन वर्षे होऊनही ते काम अजून मंजूर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पालिकेसमोरील अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनास वारंवार सांगूनही अजून ते हटविण्यात आलेले नाही. माझ्या प्रभागात काही चांगली कामे झालेली असताना ठेकेदाराची बिले काढताना विलंब केला जातो. पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे सौर दिवे लावले आहेत. ते चार तास सुध्दा चालत नाही. अशा सगळ्या कामांबाबत पालिका प्रशासन सूचना देऊनही गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाच्या दालनाबाहेर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. याप्रकरणी प्रशासनाने लवकर कार्यवाही हाती घेतली नाही तर पुढेही बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तळोदा पालिकेत सध्या भाजपची सता आहे. त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यालाच उपोषण करावे लागत असल्याने आपसातील मतभेदांबाबत तळोदा शहरात एकच चर्चा रंगली आहे.

सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू राहतेय धुसफूस

तळोदा नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवाय पालिकेत त्यांना पूर्ण बहुमत आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून या सत्ताधाऱ्यांमध्ये अधूनमधून अंतर्गत धुसफूस रंगत असल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण सहा महिन्यांपूर्वीही एका गटाने पालिकेच्या सर्वसाधारण सभेतून माघार घेतली होती. त्यावेळी सभाच तहकूब करण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. आताही उपनगराध्यक्षांनी प्रभागातील विकास कामांना हेतूत: टाळले जात असल्याचा आरोप करीत चक्क उपोषणाचे हत्यार उपसल्याने सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी उफाळून आली आहे.

कोरोना काळात पालिका फंडात निधीची अडचण होती. आता फंड उपलब्ध झाला आहे. शहरात साडेआठ कोटींच्या विकास कामांच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. याशिवाय सदर प्रभागातही साडेतीन कोटींची कामे तांत्रिक मान्यतेसाठी बुधवारीच प्रस्ताव पाठवला आहे. सध्या या प्रभागात ७० लाखांची कामे सुरू आहेत. पालिकेबाहेरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच हाती घेण्यात येईल.

-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका तळोदा