शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरातील डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा बळी गेल्याची घटना घडली आह़े शहरात डेंग्यूसदृश तापाचे थैमान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शहरातील डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा बळी गेल्याची घटना घडली आह़े शहरात डेंग्यूसदृश तापाचे थैमान सुरु असून 40 पेक्षा अधिक रुग्ण गुजरात मधे उपचार घेत असल्याने शहरासह तालुक्यात नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.फरहान मकराणी हा बारा वर्षीय बालक डेंग्युमुळे शनिवारी सायंकाळी दगावला. दुपारी त्याला व्यारा (गुजरात) येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. घरात एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मकराणी दाम्पत्याचा लाडका व एकुलता एक मुलगा मरण पावल्याने परिवाराचा आक्रोश मन हेलावणारा होता. अब्दुल खालीक महंमद माकडा (17) यास डेंग्युची लागण झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री शौचविधीस जाऊन आल्यानंतर त्यास भुरळ येऊन तो पडल्याने त्याचे मेंदु रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याचे पिता महंमद माकडा यांनाही डेंग्युची लागण झाली असुन त्यांनाही बारडोली येथे हलविण्यात आले आहे. फरहान मकराणी राहत असलेल्या गल्लीतील इतर चार बालक व्यारा येथे डेंग्युचा उपचार घेत आहेत. दोन दिवसात दोन कोवळी मुले मृत्यूमुखी पडल्याने शहर सुन्न झाले आहे. नारायणपूर रोड व शास्त्रीनगर या लागुन असलेल्या भागात या घटना घडल्या आहेत. शहरातील नारायणपूर रोड, धडधडय़ाफळी, शास्त्रीनगर, शितल सोसायटी आदी भागात डेंग्युने आपले डोके वर काढले आहे. व्यारा येथील बालरोग तज्ञाकडे शहरातील 25 रुग्ण दाखल आहेत. बारडोली येथील एक खाजगी दवाखान्यात दाखल 7 रुग्णांपैकी चार बालकांना आज सुटी देण्यात आली तर इतर तीन उपचारात आहेत. तेथीलच एक अन्य खाजगी रुग्णालयात 12 रुग्ण दाखल आहेत. सुरत येथे वेगवेगळ्या रुग्णालयांमधेही अनेक रुग्ण डेंग्युचाच उपचार घेत आहेत. शहरातील नगरसेवकाचा 15 वर्षीय बालकाचाही त्यात समावेश आहे. डेंग्युमुळे बालकांचा जीव गेल्याने हळहळ व संताप व्यक्त होत आहे. शहरात सफाईचे तीन तेरा झाले असुन पावसाच्या सातत्याने त्यात वाढ होत आहे. उपाय योजना म्हणून आज शहरातील काही भागात औषध फवारणी सुरु करण्यात आली.

दरम्यान नवागाव ता़ नवापुर येथेही डेंग्यूने कहर केला आहे. याठिकाणी तब्बल 17 रुग्ण डेंग्युची लागण झालेले आढळून आल़े याबाबतची माहिती आमदार सुरुपसिंग नाईक यांनी प्रशासनाला कळवली़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयाचे पथक नवागाव येथे दाखल झाल़े येथील काही खाजगी तर काही शासकीय रुग्णालयात दाखल आहेत़