भूकंप, महापूर, आग लागणे अशा वेगवेगळ्या आपत्ती काळाची उदाहरणे देऊन, अचानकपणे उद्भवणाऱ्या संकटाशी कसा सामना करावा, याचे प्रात्यक्षिक धडे दिले, तसेच पावसाळ्यात वीज पडून होणारी दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती आहे. शेतात काम करीत असताना सुरुवातीला पटकन सुरक्षित ठिकाणी घराच्या आडोशाला उभे राहावे, पायाखाली कोरडे गोणपाट किंवा लाकडाची फळी घ्यावी किंवा कोरडा पालापाचोळा पायाखाली घेऊन दोन्ही पाय जवळ घेऊन गुडघ्यावर हात ठेवून उभे राहावे. झाडाखाली उभे न राहता, झाडापासून दूर अंतरावर उभे राहावे. भूकंपासारख्या संकटात लाकडी टेबले किंवा दरवाज्याच्या चौकटीखाली गुडघा दुमडून बसा, एकाच ठिकाणी गर्दी करणे टाळा, धक्का बसला असता, लवकरच खुल्या मैदानात धाव घ्यावी. अशा प्रकारे विविध नैसर्गिक आपत्तीत घ्यावयाची काळजी प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक रवींद्र पाटील व शिक्षक उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीवर प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST