शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:49 IST

लोेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, ...

लोेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, बऱ्याच ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहे. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात गुरूवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान तळोदा तालुक्यात रात्रीच मुसळधार पाऊस झाला होता. शुक्रवारी दिवसभरात सर्वच तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे.तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस        तळोदा तालुक्यात येथे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास  आलेल्या वादळी पावसाने नर्मदानगर व सरदारनगर या प्रकल्पबाधितांच्या परिसरातील साधारण २५० हेक्टरवरील रब्बी हंगामातील ज्वारी पीक पूर्ण भुईसपाट झाले आहे. यात सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.         तळोदा तालुक्यातील नर्मदानगर व सरदारनगर परिसरात गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तब्बल दीड तास पावेतो पडलेल्या या वादळी पावसामुळे जवळपास २०० शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ज्वारी अक्षरशः भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काहींची ज्वारी परिपक्व होण्याचा मार्गावर होती, तर काहींची अजून तोटेच उभे होते. मात्र पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची व्यथा काही बाधित शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. आधीच सततच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर ही पिके पूर्णतः वाया गेली होती. त्यामुळे उत्पन्नावर झालेला खर्चदेखील निघाला नव्हता. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यातून सावरत शेतकरी पुन्हा रब्बीकडे वळला; परंतु या अवकाळीने पुन्हा त्यांच्या रब्बी ज्वारीचे नुकसान केल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. महसूल व तालुका कृषी प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवातशहादा तालुक्यातील लोणखेडासह परिसरात गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह, व्यावसायिक व नागरिकांची मोठ्याप्रमाणात तारांबळ उडाली. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. हवामान खात्याने ४८ ते ७२ तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु अचानक आलेल्या पावसाने एकच पळापळ सुरू झाली. या पावसामुळे सहा हजारांपर्यंत पोहोचणाऱ्या कपाशीच्या भावावरही परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावरही परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे. यावेळी मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतमजूर घराकडे           नंदुरबार तालुक्यातील लहान शहादासह परिसरात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अवेळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिक व विवाह समारंभात धावपळ उडाली होती. पाऊस सुरू झाल्याने शेतमजूर घरी परतले तर नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर अनेक मोटरसायकलधारक झाडाखाली थांबून पाऊस उघडण्याची वाट बघत होते. यामुळे रस्त्यावरील झाडांना छावणीचे स्वरूप आले होते.गहू, हरभरा व मिरचीला मोठा फटकानंदुरवार तालुक्यातील बलवंड परीसरात शुक्रवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेे.  गेल्यादोन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आणि तपमानात झालेली वाढ पाहता पाऊस पडेल की काय, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.  या पावसामुळे रब्बी हंगामाला मोठाफटका बसणार असून, गहु, कांदा व मिरची उत्पादकांना याचा फटका सोसावा लागणार आहेे.वाहन मातीत रूतल्यामुळे तारांबळ शेतकऱ्यांची तारांबळ        सारंगखेडा, ता.शहादा येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत शिवारात ऊस, पपई व केळीची वाहतूक करणाऱ्या वाहने मजुरांकडून भरण्यात आली होती. परंतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतात उभी असल्यालीही वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.हळदाणी परिसरात चाऱ्याचे नुकसान          हळदाणी, ता.नवापूर येथे गुरूवारी रात्री आठ वाजता पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे शेत शिवारात व खळ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या चाऱ्याचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते.

रोगराई पसरण्याची शक्यता            शहादा शहर व परिसरात  शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यावेळी आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या पावसाने पपई व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिकांवर रोग येण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. तसेच आलेल्या पावसामुळे शहरात एकच धावपळ उडाली. ढगाळ वातावरण व आलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला व ताप यांसारखे आजार वाढण्याची भीती नाकारता येत नाही. हा पाऊस शहरासह ग्रामीण भागातदेखील झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने केळीची तोड बंद असल्याने झाडावरचे केळीचे घड पिकले असून, ती गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात भरीस भर म्हणून अचानक आलेला पाऊस शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारा ठरत आहे.

बळीराजा पुन्हा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यासह परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकरी पीक जगविण्यासाठी अतोनात परिश्रम घेत असला तरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने बळीराजाला अडचणीत आणल्याचे दिसून येते.    आधीच खरीपात अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून सावरत नाही तोच रब्बीतदेखील पावसाने पाणी फिरवल्याने शेतकऱ्यांचा अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गुरूवारी रात्री झालेल्या पावसाने उमराणी बुद्रुक गावातील रमेश जेरमा पावरा या शेतकऱ्याच्या पिकासह परिसरातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व मका आदी पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवू द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.धडगाव परिसरात आंबा, चारोळीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने सध्या या झाडांना मोहर यायला सुरूवात झाली आहे. मात्र हा अवकाळी पाऊस या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.