शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

११ रुग्णवाहिका व १३ पोलीस वाहनांचे लोकार्पण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्यामार्फत सीएसआर निधीतून घेण्यात आलेल्या ११ रुग्णवाहिकांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्यामार्फत सीएसआर निधीतून घेण्यात आलेल्या ११ रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापैकी नऊ रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी आणि दोन जिल्हा रुग्णालयासाठी उपयोगात येणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल असा विश्वास यावेळी ॲड. पाडवी यांनी व्यक्त केला.पोलीस वाहनांचे लोकार्पणपालकमंत्र्यांच्या हस्ते १३ पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वाहनांसाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पोलिसांना वाहन प्राप्त झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. पोलीस दलासाठी आवश्यकतेनुसार आणखी वाहने देण्यात येतील असे ॲड. पाडवी यांनी यावेळी सांगितले.रक्तपेढी इमारतीचे उद्घाटनॲड. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय परिसरातील रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आणि रक्त परीक्षणासाठी रक्तपेढी आदिवासी भागासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांनी रक्तपेढीतील विविध सुविधांची माहिती घेतली.मोबाईल बँकेचे उद्घाटनदुर्गम भागातील बँकिंग व्यवहार सुरळीत व्हावे आणि नागरिकांना गावातच बँकेची सुविधा मिळावी यासाठी नाबार्डच्या एफआयएफ निधीतून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी देण्यात आलेल्या दोन मोबाईल एटीएम वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी केले. या सुविधेमुळे गरीब आदिवासी बांधवांचा शहरात येण्याचा खर्च वाचेल आणि बँकेच्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.