शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

साज बनविणा:या कुटूंबांची संख्या होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सध्या रेडीमेडचा जमाना आणि त्यात कमी होणारे पशुधन यामुळे पोळ्याच्या दिवशी लागणारा बैलांचा साजला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या रेडीमेडचा जमाना आणि त्यात कमी होणारे पशुधन यामुळे पोळ्याच्या दिवशी लागणारा बैलांचा साजला देखील मागणी कमी होऊ लागली आहे. यंदा तर अतिवृष्टीमुळे अपेक्षीत मागणीच राहीली नसल्याची खंत बद्रीङिारा, ता.नंदुरबार येथील पारंपारिक साज बनविणा:या बंजारा कंटुंबांनी सांगितले. असे असले तरी गावातील अनेक कुटूंबं आजही परंपरा कायम जोपासून आहेत.  आठवडय़ावर आलेल्या बैलपोळ्यासाठी पारंपरिक साज तयार करण्याची लगबग या गावात दिसून येत आहे. बैलांचा सन्मानाचा दिवस असलेल्या पोळ्याला जवळपास सर्वच शेतकरी आपल्या परीने खर्च करून विविध साज त्यांना चढवितात. ग्रामीण  भागात ही चढाओढ प्रकर्षाने दिसून येते. बाजारात मिळणारे हे साज तयार करण्यामागे किती हात राबतात हे नंदुरबारपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रीङिारा या गावात फिरल्यावर सहज लक्षात येईल. सध्या या गावातील घराघरात साज तयार करण्यासाठी एकच लगबग दिसून येत आहे.गेल्या तीन ते चार पिढय़ांची परंपरा टिकवून ठेवत बद्रीङिा:यातील बंजारा कुटुंबे आपल्यातील कलाकुसर जिवंत ठेवत आहेत. बैलांचा साज पाहण्यास सहजसोपा वाटत असला तरी त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे. बद्रीङिा:यातील 15 ते 20 कुटुंबे या व्यवसायात आहेत. विविध आठ ते दहा प्रकारचे साज येथे बनविण्यात येतात. त्यासाठी लागणारे साधे व विविध रंगातील सूत जिल्हय़ाबाहेरून मागवावे लागते. गावात सध्या चौथी पिढी हे काम करीत आहे. प्रत्येकाकडे कमी-अधिक प्रमाणात शेती आहे. काही मजुरी करणारी कुटुंबे आहेत. परंतु  बैलपोळ्याच्या महिनाभर आधीपासून ते या कामाला सुरुवात करतात. आताची पिढी आधुनिक व शिक्षित असल्यामुळे काहीजण हे काम टाळतात, परंतु वडीलधारी मंडळी जमेल तेवढी कामे करून आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा प्रय} करीत असल्याचे चित्र येथे दिसून येते.पूर्वी काही कुटुंबे स्वत: साज तयार करून ते बाजारात विक्री करीत असत. परंतु महागाई आणि कच्चा माल घेण्यासाठी लागणारे भांडवल परवडणारे नसल्यामुळे मजुरीच्या स्वरूपात ही कामे केली जातात.       नंदुरबारसह जिल्ह्यातील व जिल्हय़ाबाहेरील काही व्यापारी या कुटुंबांकडून विविध वस्तू तयार करून घेतात. त्यासाठी त्यांना कच्चा  माल पुरविला जातो. नगाप्रमाणे मजुरी       देऊन  वस्तू तयार केल्या जातात. त्यात  दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी वस्तूंचा समावेश करता येईल. काही कुटुंबे स्वत:च कच्चा माल आणून वस्तू तयार करतात व स्वत:च बाजारात विक्रीदेखील करतात. पशुधनाची कमी होत चालेली संख्या, शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ, यंदाची दुष्काळी स्थिती यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात वस्तू तयार होणार असल्याचे काही कुटुंबांनी सांगितले. ओंकार धनसिंग पवार यांनी सांगितले.

खादी व ग्रामरोजगार विभागाने येथील कलाकुसर अवगत असलेल्या कारागिरांना कर्ज उपलब्ध करून दिल्यास व बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास मोठी सोय होणार आहे. त्यादृष्टीने येथील काही कुटूंब खादी व ग्रामरोजगार कार्यालयात गेले, परंतु अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.

अनेक कुटूंबांची येथे दुसरी ते तिसरी पिढी राबत आहे. आताची नवीन पिढी मात्र या कलाकुसरकडे आणि व्यवसायाकडे फारशी फिरकत नसल्याची खंत येथील काही कुटूंबांनी व्यक्त केली. त्यामुळे साज तयार करणा:या कुटूंबांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. आधुनिक साधने उपलब्ध करून दिल्यास नवी पिढीही याकडे वळू शकते. 

बाजारपेठ उपलब्ध व्हावीधुळे व नंदुरबार जिल्ह्यात बैल पोळ्यासाठी साज तयार करणारे हे एकमेव गाव आहे. येथील साज खान्देशात सर्वत्र विक्री होतात. या कलेला जिवंत ठेवण्यासाठी आणि येथील कुटुंबांना आधार देण्यासाठी खादी व ग्रामरोजगार विभागातर्फे किंवा बचत गटांच्या माध्यमातून ही कला अधिक वृद्धिंगत करण्याची अपेक्षा आहे. केवळ भांडवलाअभावी मजुरीवर साजचे विविध साहित्य तयार करून देण्याची वेळ    येथील कुटुंबांवर आली आहे. योग्य मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता आणि कच्चा माल खरेदीसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्यास येथील कलाकुसर अधिक वृिद्धंगत होईल.