शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-भुसावळ मार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने मातेसह दीडवर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:56 IST

नंदुरबार : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर एक्सप्रेस गाडीतून पडल्याने 28 वर्षीय मातेसह दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला़ ही घटना सात नोव्हेंबर ...

नंदुरबार : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर एक्सप्रेस गाडीतून पडल्याने 28 वर्षीय मातेसह दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला़ ही घटना सात नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ मयत महिला ही अमरावती येथील असल्याची माहिती आह़ेनवापूर तालुक्यातील कडवान फाटा ते खातगाव यादरम्यान रेल्वेमार्गालगत 28 वर्षीय महिलेस दीड वर्षीय बालक मयतावस्थेत पडून असल्याची माहिती रेल्वे कर्मचा:यांकडून खातगाव स्टेशनमास्तरांना देण्यात आली होती़ यानुसार स्टेशनमास्तरांनी विसरवाडी पोलीसांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली़ याठिकाणी महिला आणि बालक रेल्वेतून पडून जागीच ठार झाल्याचे दिसून होत़े याप्रकरणी विसरवाडी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आह़े दरम्यान मयत महिलेचे नाव कोमलबाई शेखर खांडेकर असे असून त्या पती शेखर खांडकेर व कुटूंबियांसह सुरत येथे जात असल्याची माहिती आह़े बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मुलगा दिव्यांशू याच्यासह रेल्वेतून पडल्याचा अंदाज आह़े बराच वेळ झाल्याने त्या दिसून न आल्याने खांडेकर कुटूंबियांनी  माय-लेकराचा शोध सुरु घेतला होता़ परंतू दोघेही त्यांना दिसून आले नाहीत़ रेल्वेगाडी सुरत येथे पोहोचल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीसांना संपर्क करत घटनेची माहिती दिली़ सुरत रेल्वे पोलीसांनी नंदुरबार रेल्वे पोलीसात संपर्क केला असता, नवापूर तालुक्यातील खातगाव ते कडवान यादरम्यान महिला व बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली़ मयत महिलेच्या कुटूंबियांनी विसरवाडी ग्रामीण रूग्णालयातून दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला होता़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गावीत करत आहेत़ ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आह़े