शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

खुनात अडकवल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खुनाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग धरुन कोराई ता़ अक्कलकुवा येथील हाणामारीतून तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खुनाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग धरुन कोराई ता़ अक्कलकुवा येथील हाणामारीतून तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला़ तिघांवर चाकू आणि भाल्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत़ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ भराडीपादर ता़ अक्कलकुवा येथील जहागू सुंदा वसावे यांच्या पत्नीचा खून झाला होता़ याप्रकरणी जहांगू वसावे व त्यांच्या कुटूंबियांनी हिरालाल वसावे व त्याच्या मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या प्रकारानंतर हिरालाल वसावे हा कुटूंबासह कोराई ता़ अक्कलकुवा येथे राहण्यासाठी आला होता़ दरम्यान मंगळवारी सकाळी 11 वाजता जहांगू वसावे हे कोराई येथे आले होत़े याठिकाणी हिरालाल आटय़ा वसावे, योगेश हिरालाल वसावे, अविनाश हिरालाल वसावे, चंदन हिरालाल वसावे, चंपाबाई हिरालाल वसावे, मिराबाई दिनेश पाडवी, दिनेश लाख्या पाडवी, मनेश पाडवी यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी त्याठिकाणी उपस्थित सुरेश भामटा वसावे, देविदास सुरेश वसावे, अनिलाबाई करण वसावे, सरलाबाई सुरेश वसावे, ओलीबाई जहागू वसावे, केशरसिंग राज्या वसावे, सुमित्राबाई केशरसिंग वसावे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला़ दरम्यान हिरालाल याने हातातील चाकू जहागू वसावे याच्या पोटात मारला होता़ तसेच अविनाश याने हातातील भाला सुरेश वसावे याच्या डोक्यात मारला होता़ घटनेमुळे कोराई व खापर परिसरात तणाव निर्माण झाला़ कोराई व भराडीपादर येथील नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आले होत़े याप्रकरणी केसरसिंग वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हिरालाल, योगेश, अविनाश, चंदन, चंपाबाई वसावे, मिराबाई, दिनेश व मनेश पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़ चाकूसह भाल्याचा वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जहागु वसावे, सुरेश वसावे, देविदास वसावे यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुगणलयात दाखल करण्यात आल़े त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सर्व आठ संशयितांना पोलीसांनी अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता 29 जून र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़