शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

बोरद येथे जुगार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संचारबंदीतही जुगाराचा डाव रंगविणाऱ्यांवर तळोदा पोलिसांनी चांगलीच वक्रदृष्टी दाखविली आहे. तळोद्यात दोन ठिकाणी कारवाईनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संचारबंदीतही जुगाराचा डाव रंगविणाऱ्यांवर तळोदा पोलिसांनी चांगलीच वक्रदृष्टी दाखविली आहे. तळोद्यात दोन ठिकाणी कारवाईनंतर बोरद येथे टाकलेल्या धाडीत आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहर बळीराम ठाकरे यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.नरहर ठाकरे रा.बोरद याच्यासह मोहन दिवल्या मोरे रा.मोड, नथ्थू एलजी पाडवी रा.बोरद, जयसिंग गुलाब ठाकरे, रा.न्यूबन, कांतिलाल रमेश भिल, विनोद इंदास पाटील, नवल सुरपत पाडवी सर्व रा.बोरद यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशोक महादू पाटील, कैलास भाईदास पाडवी व रमेश नवल ठाकरे सर्व रा.बोरद हे फरार झाले.तळोद्याचे पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांना बोरद येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह शासकीय वाहनाने मोड गाठले. तेथून खाजगी वाहनाने ते बोरद येथे पोहचले. काही अंतर अलीकडे वाहन लावून शेतात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली.यावेळी तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकुण दोन लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत पोलीस कर्मचारी गणेश नथ्थू सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर पाकळे, फौजदार अभय मोरे, प्रशांत राठोड, जमादार राजू वानखेडे, हवालदार विलास पवार, प्रकाश चौधरी, राजेंद्र साबळे, दिनेश वसावे व कर्मचाऱ्यांनी केली.