शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक कठडय़ांविना पुलामुळे धोकेदायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : सध्या पाऊस होत असल्याने गोमाई नदीला पाणी आले आहे. मात्र या नदीवर प्रकाशा गावाजवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : सध्या पाऊस होत असल्याने गोमाई नदीला पाणी आले आहे. मात्र या नदीवर प्रकाशा गावाजवळ असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे चोरीला गेल्या कठडय़ांविना हा पूल असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे लोखंडी कठडे वारंवार चोरीला जात असल्याने पोलिसांनी चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.प्रकाशा गावालगत असलेली गोमाई नदीत सध्या तापी नदीचे फुगवटय़ाचे पाणी आल्याने काठोकाठ भरली आहे. या नदीवर असलेल्या पुलावरुन नांदरखेडा, सारंगखेडा, शेल्टी, सजदे, टेंभे या गावांकडे जाणा:यांची नेहमी वर्दळ असते. तसेच शेतकरी, शेतमजुरांचा हा मुख्य मार्ग आहे. मात्र या            पुलाचे संरक्षक कठडे लोखंडी असल्याने ते चोरटय़ांनी चोरुन नेले होते. सिंहस्थ पर्वणी काळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे लोखंडी पाईप वेल्डींग करून बसवण्यात आले होते. मात्र ते पुन्हा चोरीला जात असल्याने हा पूल संरक्षक कठडय़ांविना आहे. नदीच्या पलिकडे येथील शेतक:यांची  शेती असल्याने शेतकरी व मजुरांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागते. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाच्या कठडय़ांचे पाईप चोरणा:यांचा शोध घ्यावा व या पुलाला सिमेंट काँक्रिटचे कठडे बसवावेत, अशी मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयगणेश पाटील, अरुण चौधरी, सुरेश गोरख चौधरी, नारायण             मोहन चौधरी व शेतक:यांनी केली आहे.