शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोगापूर शिवारात ठिंबक सिंचनच्या नळ्या व पाईपांना आग लावून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:44 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील गोगापूर शिवारात शेतात ठेवण्यात आलेल्या ठिंबक सिंचनच्या पाईप व नळ्यांना अज्ञात माथेफिरुने ...

 लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील गोगापूर शिवारात शेतात ठेवण्यात आलेल्या ठिंबक सिंचनच्या पाईप व नळ्यांना अज्ञात माथेफिरुने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग लावल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे एक ते सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, गोगापूर येथील शेतकरी गणेश बाळकृष्ण सोनार यांचे गोगापूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात गहूची पेरणी केली आहे. त्याठिकाणी ३० ठिंबक सिंचनाचे बंडल तसेच पीव्हीसी पाईपचे २० नग गोळा करुन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने या नळ्या व पाईपांना आग लावून पोबारा केल्याचे शेजारील शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला संपर्क करून सांगितले. घटनास्थळी शेतकरी गणेश सोनार हे आले असता त्यांना  संपूर्ण ठिंबक नळ्या, पाईप जळून खाक झाल्याचे दिसून आले. त गणेश सोनार यांचे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सोनार  यांनी या घटनेची माहिती शहादा पोलीस ठाण्यात दिली असून या माथेफिरुचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.कर्ज काढून घेतले होते ठिंबक सिंचनआधीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून सडून गेला. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागला. मागील दुःख बाजूला ठेवत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले होते. गणेश सोनार यांनी आपल्या गहू पिकात ठिंबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कर्ज काढून पाईप व नळ्या आणल्या होत्या. त्यातच अज्ञात माथेफिरूने ठिंबक सिंचनच्या साहित्याला आग लावून पोबारा केल्याने गणेश सोनार यांना आर्थिक फटका बसला आहे .