शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धुरखेडा रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सोयीस्कर आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्याच्या रुंदीकरणाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सोयीस्कर आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने गेल्या दीड वर्षापासून लहान-मोठी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र या रस्त्यावर सद्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.प्रकाशा ते धुरखेडा हा मार्ग शहादा जाण्यासाठी सर्वाना सोयीचा आहे. मात्र या रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे व खड्डय़ांमुळे रस्त्याची झालेली चाळण ही वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रकाशा-शहादा रस्त्यावर कामे जरी सुरू असली तरी पर्यायी रस्ता केला पाहिजे होता. मात्र तसे झाले नाही. या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दुचाकींसह लहान-मोठी वाहने या सर्वाना फेरा मारुन जावे लागते. प्रकाशा ते शहादा 12 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र रस्ता खराबमुळे तब्बल 20 ते 22 किलोमीटर फिरून जावे लागते. मात्र तो रस्ताही सुस्थितीत नाही. प्रकाशा येथून धुरखेडाकडे  जाताना सुरुवातीला काटेरी झुडपांचा सामना करावा लागतो. तसेच रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने सुमारे तीन ते चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघातही होत असून संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.