शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

‘गोविंदा रे गोपाला’च्या जयघोषात दहीहंडी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील सुभाष चौकात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील सुभाष चौकात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या उत्सवात तालीम संघाचे नऊ पथक सहभागी झाले होते. शांतीसागर कै. सुपडू मराठे (पैलवान) यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी नऊ वाजेपासूनच शहरातील विविध व्यायाम शाळेतील कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत सुभाष चौकात येत होते. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात थरवर थर रचण्यात येवून हंडी फोडण्याचा प्रय} विविध तालीम संघाचे कार्यकर्ते करीत होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितीतांचा जल्लोष अधीकच वाढत होता. दुपारी साडेबारा वाजेर्पयत हा उत्सव रंगला होता.सहभागी झालेल्या तालीम संघांमध्ये श्री सावता माळी व्यायामशाळा, विर शैव लिंगायत गवळी व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, मा भगवती पुत्र व्यायाम शाळा, श्री शबरी व्यायामशाळा, सार्वजनिक व्यायाम शाळा, जय संताजी व्यायाम शाळा, श्री वायुपुत्र व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर व्यायाम शाळा इत्यादी व्यायाम शाळेचा समावेश होता. या व्यायाम शाळेतील गोविंदा पथकानी ढोल-ताशांच्या गजरात आणि गोविंदाच्या जय घोषात  दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.सहभागी सर्व तालीम संघांना दहीहंडी फोडण्यासाठी संधी देण्यात आली. त्यापैकी चार संघांचे  गोविंदा दहीहंडी फोडण्यात यशस्वी झाले.गोकुळाष्टमी निमित्ताने हा कार्यक्रम शेखर मराठे, संजय भदाने, जितेंद्र मराठे, दिनेश कुंकारी, बलराज राजपूत यांनी आयोजित केला होता. पोलीस निरीक्षक नंदवाळकर हे यावेळी उपस्थित होते. सुभाष चौकात रंगलेल्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.