शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या आवाजाने क्षणभर घबराट

By admin | Updated: March 9, 2017 01:02 IST

धडगाव येथील घटना : वेल्डिंगच्या दुकानातील घटना; जखमींमध्ये बाप-लेक

धडगाव : शहरातील शहादा रस्त्यावर एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन तिघे जखमी झाल्याची घटना घटना घडली़ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे धडगाव शहरात एकच खळबळ उडाली़ धडगावातील शहादा रस्त्यावर  रमेश नारसिंग पावरा (४५) यांचे गॅस वेल्डिंगचे दुकान आहे़ या ठिकाणी त्यांना त्यांची मुले मुले दिनेश रमेश पावरा (१५) व दिलवर रमेश पावरा (१४) हे दोन्ही मदत करतात़ बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे रमेश पावरा यांनी दुकान उघडून विविध कामांना सुरुवात केली़ या वेळी त्यांच्याकडे असलेल्या कार्पेट सिलिंडरचा अचानक स्फोट झाला़ हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, दुकानातील तिघे सिलिंडरमधून बाहेर पडलेल्या विस्तवासारख्या पदार्थामुळे भाजले गेले़ मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरून जाणारी वाहने थांबली, तर रोषमाळ परिसरातील नागरिकही या ठिकाणी धावून मदतीसाठी गेले़ स्फोटानंतर सिलिंडर सुमारे २० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडून रस्त्यालगत असलेल्या नालीत पडले़ नागरिकांनी या ठिकाणी माहिती घेत तत्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली होती़ मात्र रुग्णवाहिका येत नसल्याने नागरिकांनी खासगी वाहनातून तिघा जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येऊन तिघांना तातडीने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले़ नंदुरबार सामान्य रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे़     (वार्ताहर)रुग्णवाहिकेतील डॉक्टरची मनमानी धडगाव येथे झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी रुग्णवाहिका पाचारण करूनही आली नाही़ ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचे दिसून आले़ हे डॉक्टर शहादा येथून रुग्णवाहिकेत बसणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातलगांना देण्यात आली़ संबंधित १०८ रुग्णवाहिके कार्यरत डॉक्टरकडून हा प्रकार सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत होती़