शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना होत असून, शेतात नुकसानही होत आहे. म्हसावद गावालगत असलेल्या पिंपरी येथील शेतकऱ्याच्या चार एकर उसापैकी चक्क दीड एकर ऊस या मोकाट गुरांनी फस्त करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.म्हसावद गावालगत असलेल्या केळी व उसाच्या शेतात वराहांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीच्या शेताला चोहोबाजूने तारेची जाळी बसवून कुंपण केले आहे. तरीही जाळी वाकवून खालून वराह घुसतात. काही वराहांचा मुक्काम तर उसाच्या शेतातच असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय?हा प्रश्न पडला आहे. पिंपरी येथील शेतकरी रघुनाथ अर्जुन पाटील यांचे म्हसावद गावालगत चार एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून शेताला काटेरी तारेचे कुंपणही केलेले असूनही मोकाट गुरांनी चक्क दीड एकर ऊस फस्त केला आहे. शिल्लक उसाची ऊंची एक फुटावर तर खाऊन नुकसान केलेला ऊस जमीनदोस्त झालेला आहे. टवळाई रस्त्यालगत असलेल्या म्हसावद येथील नगीन छगन चौधरी यांचा एक एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे. दुसरीकडे गावालगत रिकाम्या गुरांच्या झुंडीच्या झुंडी गहू, हरभरा पेरणी केलेल्या शेतांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत. पिकांचे खाऊन नुकसानीपेक्षा पिके पायदळी जास्त तुडवले जात असल्याने जास्त नुकसान होत आहे. रिकाम्या गुरांना पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून, पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. यात काही दुभती जनावरेही आहेत. पशुपालक सकाळ-संध्याकाळ दूध काढून घेतात, चारा मात्र टाकत नाही. बेवारस गुरांप्रमाणे सोडून मोकळे होतात. रिकामी गुरे रात्रभर शेतात, तर दिवसा गावात त्रास देत आहेत. रिकामी गुरे पकडून गोशाळेत पाठवावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेकवेळा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे कळवूनही काही कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. रिकामी गुरे पकडून कोंडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. मात्र त्यात चार-पाच वर्षांपासून एकही गुरेढोरे कोंडली गेलेली नाहीत. कोणीही गुरे पकडून आणत नाही. गुरे कोणी पकडली? का पकडली? नुकसान दाखव? यावरून वाद होतात यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.