शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकीस अडथळा प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, विसरवाडी, सारंगखेडा  येथे वाहतुकीस अडथळा आणणा:या 14 जणांविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, विसरवाडी, सारंगखेडा  येथे वाहतुकीस अडथळा आणणा:या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धडगाव येथे चौकात मगन रुमल्या पावरा यांनी महिंद्रा पीकअप वाहन भर रस्त्यावर लावून वाहतूक अडथळा आणला. जमादार अभय मोरे यांच्या फिर्यादीवरून मगन पावरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडदिगर गावात नितीन जयप्रकाश भारती, रा.ब्राम्हणपुरी यांनी मालवाहू वाहन रस्त्यावर उभे करून अडथळा आणला. पोलीस नाईक घन:शाम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नितीन भारतीविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलगी येथे बाजारात नितेश दाज्या पाडवी यांनी प्रवासी वाहन रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा आणला. याबाबत पोलीस नाईक गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून नितेश पाडवीविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकुवा येथे बसस्थानक परिसरात विष्णू विनेश पाडवी याने मालवाहू वाहन उभे करून अडथळा आणला. हवालदार गुलाब जोहरी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील काका का ढाबाजवळ दिनेश इंद्रसिंग राजपूत याने व्हॅन रस्त्यावर लावून अडथळा आणला. पोलीस नाईक साहेबराव गावीत यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचपाडा येथे मंगेश किसन वसावे याने प्रवासी रिक्षा बाजार चौकात उभी करून अडथळा आणला. पोलीस कर्मचारी साहेबराव जाधव यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विसरवाडी येथे बाजारात आशिष सुभाष वळवी यांनी प्रवासी रिक्षा उभी करून रहदारीस अडथळा आणला. पोलीस शिपाई सिताराम पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील साक्री रोडवरील मध्यवर्ती कारागृह परिसरात काशिनाथ आत्माराम बोरसे यांनी प्रवासी रिक्षा रस्त्यावर उभी केली. हवालदार अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळोदा बसस्थानक परिसरात कुणाल भटू राजकुळे यांनी वाहन रस्त्यावर लावले. पोलीस कर्मचारी उमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी इरफान वजीरोद्दीन शेख यांनी देखील वाहन उभे केले. सागर संजय जव्हेरी यांच्या फिर्यादीवरून देखील तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सारंगखेडा बसस्थानकात प्रदीप विठ्ठल राजपूत यांनी रस्त्यावर मालवाहू वाहन लावले. पोलीस कर्मचारी दिनेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात नोंद करण्यात आली. शहादा येथे गांधी पुतळासमोर असलम अलमास बागवान यांनी फळ विक्रीची लॉरी लावली. पोलीस शिपाई अजय पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.