लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर सिमा तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणा:या ट्रक चालकाविरोधात कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला़ मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ही कारवाई केली़ तेलंगणा राज्यातून गुजरात राज्यात जाणा:या टीएस 26 टी 5011 हे वाहन गुलीउंबर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली़ यावेळी त्यात 1 हजार 270 किलो अधिक माल भरल्याचे दिसून आले होत़े याबाबत मोटार वाहन निरीक्षक दिलीप भाऊराव बाविस्कर यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचालक किशन भदरु बेनोथ याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस पोलीस नाईक गावीत करत आहेत़
ट्रकचालकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:00 IST