शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून कोरोना पोहोचला तोरणमाळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे मुंबईहून ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे मुंबईहून कोरोना पोहोचून एका ३५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. सुरूवातीला शहरी भागात असलेला आता हा संसर्ग ग्रामीण भागात पोहोचू लागल्याने चिंता वाढत आहे. त्यातच आदिवासी दुर्गम-अतिदुर्गम भागात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने तोरणमाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून निसर्ग सौंदर्य असून पावसाळ्यात या भागातील सौंदर्य मोठ्या प्रमाणावर खुलते. याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. लॉकडाऊन असल्याने कंटाळवाणा झालेले नागरिक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे गर्दी करीत होते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने तोरणमाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले राणीपूर येथेच पर्यटकांना येण्यास बंदी घातली होती. परंतु तोरणमाळ हा अतिदुर्गम भाग कोरोनापासून लांब असताना अचानक तोरणमाळला मुंबईहून आलेले जावई व मुलगीच धुळे येथे पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेली तोरणमाळ येथील एका हॉटेल व्यावसायिक ३५ वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्याने भीतीपोटी त्यांना धुळे येथे घेऊन जाण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल ५ आॅगस्ट रोजी धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने तोरणमाळ येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या ३५ वर्षीय महिलेच्या जवळील एकूण १६ जणांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. उर्वरित संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करून त्याना होम क्वारंटाईन करण्यात येत असून तोरणमाळ कंटेनमेन्ट झोन तसेच बफर झोन करण्यात आले आहे. याठिकाणी तहसीलदार तथा इनसिडेंट कमांडर सपकाळे, धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बडे यांच्या मार्गदर्शनाखाली झापी प्राथमिक आरोग्य केंद्राचे परमांत रावले, मालती ठाकरे व आरोग्य कर्मचारी जवळील पाड्यांवर सर्वेक्षण करीत असून विविध उपाययोजना करीत आहेत.तोरणमाळ १४ दिवस लॉकडाऊनतोरणमाळ येथील ३५ वर्षीय महिलेचा अहवाल धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने तोरणमाळ येथे खळबळ उडाली असून तोरणमाळ हे १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.