शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंध सर्वेक्षण रासेयो स्वयंसेवक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : पालिकेच्या कारोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : पालिकेच्या कारोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेउन सर्वेक्षण सुरु केले आहे.नवापुर प्पालिकेच्या कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात वरिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवकांची मदत होऊ शकते असे संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांनी सुचविले. यानुसार रासेयो समन्वयक डॉ. छाया गावीत व त्यांच्या चमूने सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतील अशा स्वयंसेवकांची यादी तयार केली. नगराध्यक्षा हेमलता पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी यांच्याशी चर्चा करून स्वयंसेवकांना नंदकुमार वाळेकर व डॉ. कोकणी यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात कोरोना विषाणू संदर्भात माहिती देउन सर्वेक्षण दरम्यानच्या प्रश्नावली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, सॅनीटायझरचा वारंवार उपयोग आदी बाबतीत जनजागृती करण्यासाठी मागर्दर्शन करण्यात आले. लॉक डाऊनच्या काळात सर्वेक्षणासाठी पुढे येऊन स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य हाती घेतल्याबद्दल आमदार शिरीष नाईक, प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल व उपप्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेतर यांनी समाधान व्यक्त केले. नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, अजय पाटील, अमृत लोहार, मुख्याधिकारी राजेंद्र नजन, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नवापूर शहरात आरोग्य तपासणी कामी माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले. नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याचे पालिकेने कळवले आहे़राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० स्वयंसेवक विद्यार्थी व प्रा. डॉ. छाया गावीत यांना पालिका मुख्यधिकारी राजेंद्र नजन यांनी योग्य त्या सुचना देऊन विद्यार्थ्यांना हात मोजे, मास्क व सॅनेटाझर उपलब्ध करुन दिले आहेत़