शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : परिसरातील शेतांमध्ये वाकी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने केळी, पपई, ऊसासह इतर पिकांसह शेती वाहून गेल्याने शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. नदीतील गाळ व वाळू घुसल्याने शेतांचे नदी-नाल्यात रुपांतर झाले आहे.अतिवृष्टी व महापुराने शहादा तालुक्यातील परिवर्धे, कोठली, त:हाडी, कलसाडी, सोनवल, जावदा, वाडी पुर्नवसन, कलमाडी आदी गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाकी नदीला आलेला महापुराने कोठली व परिवर्धे गावाला चोहोबाजूंनी वेढा दिला असून शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरांची पडझड झाली. पुराचे पाणी गावात घुसल्याने कोठली ग्रामस्थांनी त:हाडी गावात आसरा घेतला. वाकी नदीचा उगम धडगाव रस्त्यावरील नणंद-भावजयी घाटापासून आहे. नदीच्या उगम क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने नदीला महापूर आला होता. हा महापूर 2006 पेक्षाही भयानक होता. नदीजवळील शेतातील पपई, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके वाहून गेल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीने वेगळेच वळण घेतल्याने वाघोदा ते परिवर्धा,   परिवर्धा ते कोठली रस्ता वाहून     गेला. सपाट शेतजमिनींचे नाल्यात रुपांतर झाले आहे. परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्रीर्पयत सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.दरम्यान, शनिवारी येथे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक आले असता गामस्थांनी त्यांना पंचनामे करु दिले नाही. ज्यांनी अवैध जागेवर घर बांधलेले आहे त्यांचेही पंचनामे शासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली.आमदारांकडून पाहणीशहादा तालुक्यातील परिवर्षे, त:हाडी, सोनवल इतर शिवारात पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी रविवारी कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी सहायक धनराज निकुंभे आदींनी केली. शासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विभागांच्या सुटय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज शासनाला कळवावा लागणार असल्याने रविवारी कृषी अधिकारी यांनी या भागात पाहणी केली.  संध्याकाळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही परिवर्धे  व कोठली गावातील नुकसानीची पाहणी केली. वाकी नदीवरील वाहून गेलेली संरक्षण  भिंत, विजेचे खांब आदींचीही पाहणी केली. कोठली गावाचे इतरत्र  पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.