शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:04 IST

­n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनास जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष तसेच ...

­n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनास जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष तसेच सामजिक संघटनांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. यांतर्गत मंगळवारी  भारत बंदमध्ये या संघटनांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. या बंदमध्ये  नर्मदा बचाओ आंदोलन, आदिवासी एकता परिषद, महा अंनिस, महिला किसान अधिकारी मंच,  ज्येष्ठ नागरिक संघटना, माकप, फुले -आंबेडकर स्टडी सर्कल, भिलिस्तान टायगर संघटना, जय आदिवासी ब्रिगेड, सिद्धार्थ युवक मंच, एकलव्य युवक संघटना, लोकमंच अभ्यास गट, आदिवासी क्रांती दल, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी सहभाग घेतला होता. या भारत बंदला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला. सकाळपासून विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्रितपणे शहरातील विविध भागात व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते. दरम्यान सकाळी नवापूर येथून  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे जीप व मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. दुपारी १२ वाजता ही रॅली नवापूर शहरात आली होती. येथून शहरातील विविध भागात ही रॅली काढून नेहरु चाैकात समारोप करण्यात आला.   नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. शहरातील नेहरू चाैकात झालेल्या निदर्शनांमध्ये रामसिंग गावीत, करणसिंग कोकणी, रणजीत गावीत, दिलीप गावीत, जगन गावीत, आर.टी.गावीत,  विक्रम गावीत, मनोहर वळवी, लिलाबाई वळवी, जमनाबाई ठाकरे, बकाराम वळवी यांच्यासह  पुरूष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.  ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येवून केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

सराफ बाजार बंद  n शहरातील सराफ बाजारात १०० टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकाळपासून एकही दुकान सुरू नव्हते.  n भारत बंदमध्ये बाजार समित्यांनी सहभाग घेतला होता. नंदुरबार बाजार समितीत धान्य, भाजीपाला खरेदी बंद ठेवण्यात आली होती. यातून येथील उलाढाल पूर्णपणे थांबली होती. शेतक-यांना आधीच माहिती असल्याने त्यांनीही भाजीपाला, कांदा, धान्य व कापूस विक्रीसाठी आणलेला नसल्याचे सांगण्यात आले. n शहादा, अक्कलकुवा, नवापूर, तळोदा बंदला मोठा प्रतिसाद होता. धडगाव येथे कडकडीत बंद पाळून कृषी कायद्यांचा निषेध केला गेला. येथे सर्व दुकाने बंद होती. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस तैनात  n भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आठवडे बाजार असल्याने मंगळवारी गर्दी होण्याची शक्यता होती. यातून व्यवसाय होणार असल्याने अनेकांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी ९ वाजेपासून शास्त्री मार्केट, मंगळबाजार, पालिका परिसर, स्टेशन रोड या भागातील व्यावसायिक एकमेकांना संपर्क करत दुकाने सुरू करण्याबाबत विचारपूस करत होते. अखेर सर्वसमंतीने ९ वाजेनंतर दुकाने सुरू करण्यात आली. काहींनी मात्र दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत व्यवसाय बंद केले.