शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाच्या तोंडावर नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील तीन हजार शेतक:यांना कापसाच्या बोंड अळीची नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागून असून, याप्रकरणी शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील तीन हजार शेतक:यांना कापसाच्या बोंड अळीची नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागून असून, याप्रकरणी शासनाने उदासिन भूमिका घेतल्यामुळे शेतक:यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सद्याच्या खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमिवर शेतक:यांना आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन निदान लोकप्रतिनिधींनी तरी याबाबत शासनाचे लक्ष वेधावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.गेल्या वर्षी कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला होता. परिणामी शेतक:यांचे 15 ते 20 टक्के देखील कापसाचे उत्पन्न आले नाही. एवढेच उत्पन्नावर केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. साहजिकच शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला होता. ही पाश्र्वभूमी लक्षात घेवून राज्यशासनाने गेल्या बोंडअळींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनामार्फत तालुकास्तरावरील महसूल कर्मचा:यांना शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तालुका महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार महसूल कर्मचा:यांनी तालुका कृषी विभागाच्या सहकार्यातून प्रत्यक्ष शेतावर जावून शेतक:यांच्या कापसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर केले होते.तळोदा तालुक्यात साधारण सात हजार 135 शेतक:यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. तसा अहवालही तत्कालीन तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे दिला होता कोरडवाहू शेतक:यास हेक्टरी सहा हजार 800 रुपये तर बागायतदार शेतकरींसाठी 13 हजार 500 रुपये या प्रमाणे नुकसानीची रक्कम देण्यात येणार होती. परंतु तळोदा तालुक्यातील अजूनही तीन हजार 200 शेतक:यांना शासनाकडून आपल्या नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही.  शासनाची बोंड अळीची नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी ग्रामीण खेडय़ातून तहसील कार्यालयात थेटे मारीत आहेत. 

तळादा महसूल कर्मचा:यांकडून शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे दोन टप्प्यात करण्यात आले होते. दुस:या टप्यात साधारण तीन हजार 200 शेतक:यांचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामुळे सदर शेतक:यांच्या नुकसानीची रक्कम देण्यासाठी येथील महसूल प्रशासनाने डिसेंबर 2018 मध्येच तीन कोटी 34 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. जिल्हा प्रशासनानेही वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी केली आहे. मात्र याप्रकरणी शासनाने कानावर हात ठेवले आहे.  एवढेच नव्हे केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेसाठी येथील महसूल प्रशासनाने तालुक्यातून जवळपास दहा हजार शेतक:यांची नियमानुसार ऑन लाईन माहिती भरली आहे. यातील 25 टक्के शेतक:यांना ही साधी पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात.