शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

७०० विद्यार्थ्यांनी केले सामूहिक सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्यमय व व्याधीमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी ७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक सूर्यनमस्काराने नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरोग्यमय व व्याधीमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी ७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक सूर्यनमस्काराने नवीन वर्षाचे स्वागत केल्याचा उपक्रम शहरातील हिग़ो़श्रॉफ हायस्कूलमध्ये पार पाडला़ १ जानेवारीच्या सकाळी झालेल्या या उपक्रमात शिक्षकांचाही सहभाग होता़कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, चेअरमन अ‍ॅड़ रमणलाल शहा, सचिव डॉ़ योगेश देसाई, शिक्षणाधिकारी एम़व्हीक़दम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, योग विद्या धामचे जगदीश सोनी, बळवंत निकुम, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे, मनिष शाह, चंदर मंगलाणी प्रकाश चौधरी, म्उपस्थित होते़कार्यक्रमात माहिती देताना मुख्या्ध्यापिका सुषमा शाह यांनी आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम होत असल्याची माहिती दिली़ शिक्षकांच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी वर्तुळाकार परिघ रचना तयार करुन मध्यभागी सूर्याची प्रतिकृती तयार केली होती़ विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमात उपस्थित मान्यवरांनीही सहभाग घेत सूर्यनमस्कार केले़सूत्रसंचालन चेतना पाटील यांनी तर आभार राजेश शाह यांनी मानले़दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ सांस्कृतिक कार्यक्रमांसह रात्री उशिरापर्यंत स्रेहमेळावे सुरु होते़ नंदुरबार शहरातील मिशन कंपाउंडमध्ये नवीन वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले़ तर शहरातील विविध भागात युवकांकडून डीजे सह पारंपरिक वाद्यांवर ताल धरत नवीन वर्षाचे स्वागत केले होते़ रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स व ढाबे सुरु होते़ पोलीसांकडून या सर्व ठिकाणांवर वेळोवेळी भेटी देऊन माहिती घेण्यात येत होती़