शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 24 तास सुरु राहणार आचारसंहिता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचेकडे या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचेकडे या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जिल्ह्यातील चारही मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबाबत कक्षाचे विशेष लक्ष राहणार आहे. कक्षात पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी 24 तास हजर राहून येणा:या तक्रारींची नोंद घेणार आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तात्काळ संबंधित विभागास कारवाई करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.सिव्हीजील अॅपवर प्राप्त तक्रारींवर कार्यवाहीबाबतचा आढावादेखील या कक्षाकडून घेण्यात येणार आहे. केंद्रीत पद्धतीने तक्रारींची दखल घेण्यात येणार असल्याने त्याबाबत वेगाने कार्यवाही करणे शक्य होणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी चारही विधानसभा मतदारसंघात दूरचित्रीकरण पथकाचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.कक्षात (02564- 210777)  हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना (1950) या टोल फ्री क्रमांकावरदेखील तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भरारी पथकांची मदत घेण्यात येणार आहे. नागरिकांनी निवडणुका पारदर्शक पद्धतीने व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहाय्य करावे व आचारसंहिता भंगाबाबत आचारसंहिता कक्षाकडे माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.