शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भादवड येथे वर्गखोल्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या ‘विशेष प्रकल्प’अंतर्गत भादवड येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा लोकार्पण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या ‘विशेष प्रकल्प’अंतर्गत भादवड येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते मंगळवारी झाला.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील मुख्यमंत्र्यांच्या एक हजार गावांच्या कायापालट कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अभियानात समाविष्ट असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या एका महत्त्वाच्या गरजेचे प्रपोजल बनवून दिले. भादवड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याचा प्रकल्प सादर केला होता. 11 लाख 50 हजार रुपये या प्रकल्पाची किंमत होती. त्यात ग्रामपंचायतीने एक लाख 50 हजार टाकायचे ठरविले व 10 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाकडून उपलब्ध करून देण्यात आला. हा प्रकल्प कार्यारंभ आदेश दिल्यापासून तीन महिन्यात नऊ लाख 97 हजारात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. या वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मंजुळे यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या आवारात हे रोपटे   लावण्यात आले व त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शाळेने घेतली. विशेष प्रकल्पाबद्दल माहिती देताना अभियानाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी अॅड.योगिनी खानोलकर यांनी ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी, ग्रामपरिवर्तक अविनाश पाटील, सरपंच संजय वळवी, उपसरपंच ताईबाई नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वळवी व ग्रामस्थांनी जलद गतीने बांधकाम केल्याबद्दल कौतुक केले.जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले की, ख:या अर्थाने गावामध्ये बदल घडवायचा असे तर त्याची सुरुवात शिक्षणाने करायला पाहिजे. या प्रकल्पाव्यतिरिक्त शाळेला नवीन मानकांप्रमाणे अतिरिक्त ज्या खोल्या लागतील त्या मंजूर करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.सूत्रसंचालन जि.प. शाळेचे शिक्षक धीरज खैरनार यांनी केले. केंद्रप्रमुख तांबोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे, विस्तार अधिकारी कुवर, नवापूर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींचे ग्रामपरिवर्तक महेश जाधव, पंकज ठाकरे, बिजगावचे ग्रामविकास अधिकारी करोडीवाल आदी           उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामपरिवर्तक अविनाश पाटील, मुख्याध्यापक गावीत, गांगुर्डे, गावीत, सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अशोक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.  जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी भादवड गावातून फेरफटकाही मारला. घरोघरी भिंतीवर चांगल्या प्रकारचा संदेश, स्वच्छतेचे त्यांनी कौतुक केले. जि.प. शाळेतील विद्याथ्र्याना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. निरुपयोगी इमारतीतून साकारलेल्या गावातील सार्वजनिक वाचनालय, टपाल कार्यालय व ग्राम संगणक कक्षालाही त्यांनी भेट दिली. राष्ट्रीय पेयजल योजनेतून सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा नळावरील पाण्याची चव घेऊन समाधान व्यक्त केले.